Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Seed Supply : गेल्या तीन वर्षांत महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ (महाबीज) ने बियाणे व्यवसायात लक्षणीय वाढ साध्य केली आहे.
Seed Production
Seed ProductionAgrowon

Akola News : गेल्या तीन वर्षांत महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ (महाबीज) ने बियाणे व्यवसायात लक्षणीय वाढ साध्य केली आहे. गेल्या तीन वर्षांत सोयाबीन बियाण्यात सुमारे तिप्पट, हरभरा, गहू बियाण्यात जवळपास दुप्पट वाढ करण्यात यश आले आहे.

महाबीज ही भारतातील सर्व राज्य बियाणे महामंडळांमधील एक सर्वात मोठे आणि अग्रणी असे राज्य बियाणे महामंडळ म्हणून ओळखले जाते. रविवार (ता.२८) पासून महाबीज ४९ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.

मागील काही वर्षात या महामंडळाने बियाणे विक्रीत राज्यात पुन्हा आपले स्थान बळकट केले आहे. बियाणे पुरवठा वाढवण्यात यश मिळवले आहे. महाबीजने गेल्या तीन वर्षांत खरिपातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन बियाणे ४८ हजारांवरून १ लाख ६५ हजार क्विंटल, हरभरा बियाणे १.६० लाखांवरून २.३० लाख क्विंटल, तर गहू बियाणे ३२ हजारांवरून ७० हजार क्विंटलवर नेले आहे.

Seed Production
Mahabeej Theft : ‘महाबीज’च्या गोदामातील सोयाबीन बियाणे चोरीप्रकरणी गुन्हा

मध्यंतरी हवामान बदलाचा या महामंडळाच्या बीजोत्पादन कार्यक्रमाला मोठा फटका बसला. प्रामुख्याने खरिपातील बीजोत्पादन गेल्या काही वर्षात सातत्याने घटल्याचे प्रकार झाले. मात्र, सातत्याने शेतकऱ्यांचे प्रयत्न, प्रशासनाचा पाठपुरावा यामुळे आता बियाणे पुरवठ्याच्या क्षेत्रात महाबीजने मोठी झेप घेतली आहे.

महाविजने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त रब्बी ज्वारीची ३० हजार क्विंटलची विक्री केली आहे. याची सरासरी विक्री ८ हजार क्विंटल आहे, हे विशेष. तसेच तृणधान्य (कोदो, राजगिरा, नाचणी, राळा) आदीची मोठी उपलब्धता करून शासकीय योजनांमध्ये वेळेत यशस्वीपणे पुरवठा केला. चारा पिकांच्या बियाण्यातही उच्चांकी वाढ नोंदवली आहे. या बियाण्यांची सरासरी विक्री उलाढाल ६ कोटी इतकी होती. तर गेल्या वर्षात हीच विक्री सुमारे ३० कोटींच्या घरात होती.

Seed Production
Mahabeej : शेतकर्‍यांसाठी अविरत झटणारे ‘महाबीज’

‘महाबीजने बियाण्यांसोबतच आता द्रवरूप जैविक खते, जैविक बुरशीनाशक, ऊतिसंवर्धित रोपांच्या क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. खात्रीशीर उत्पादनांची शाश्‍वती दिली जात असल्याने शेतकऱ्यांची पसंती वाढली आहे.

द्रवरूप जैविक खतांची विक्री २०२३-२४ वर्षात एक लाख ४५ हजार लिटर्सपर्यंत पोचली, तर जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा १८०० क्विंटलपर्यंत विक्री केला. महाबीजच्या ऊतिसंवर्धित केळी रोपांची विक्री २ लाखांवर झाली. तर यावर्षी हेच उद्दिष्ट्य साडेतीन लाखांवर निश्‍चित केले आहे,’’ अशी माहिती गुणवत्ता नियंत्रण महाव्यवस्थापक प्रफुल्ल लहाने यांनी दिली.

बियाणे विक्रीत ६३ टक्के वाढ

‘‘महाबीजने उपलब्ध केलेल्या बियाण्यांपैकी ९८ टक्के बियाणे विक्री मागील वर्षात साध्य झाली. एकंदरीत बियाण्यांच्या विक्रीचा विचार केला तर २०२२-२३ या आर्थिक वर्षापेक्षा २०२३-२४ या वर्षात महाबीजने तब्बल ६३ टक्के विक्रमी वाढ साध्य झाली,’’ अशी माहिती महाबीजचे विपणन महाव्यवस्थापक प्रकाश ताटर यांनी दिली.

महाबीजने गुणवत्ता, दर्जा कायम राखत शेतकऱ्यांचा विश्‍वास टिकविला आहे. याच जोरावर महाबीजचे बियाणे, विविध उत्पादने राज्यभर पसंतीस उतरली आहेत. गेल्या तीन वर्षांत यशाचा आलेख वाढता आहे.
- सचिन कलंत्रे, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com