आंबा पीकविमा योजना निकषांत हवी सुधारणा : महाकेसर आंबा बागायतदार
आंबा पीकविमा योजना निकषांत हवी सुधारणा : महाकेसर आंबा बागायतदार 
मुख्य बातम्या

आंबा पीकविमा योजना निकषांत हवी सुधारणा : महाकेसर आंबा बागायतदार

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : आंबा पिकाविषयी पीकविमा योजनेचे निकष योग्य नसल्याने त्यात सुधारणा करण्याचा आणि त्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव, महाकेसर आंबा बागायतदार संघाच्या दुसऱ्या बैठकीत करण्यात आला.  महाकेसर आंबा बागायतदार संघाची दुसरी बैठक संघाचे संचालक नंदलाल काळे यांच्या वडावळी (ता. पैठण) येथील शेतात नुकतीच पार पडली. बैठकीच्या अगोदर श्री. काळे यांच्या दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या पाच एकर केसर आंबा बागेत शिवारफेरी करण्यात आली. या वेळी डॉ. भगवानराव कापसे तसेच शेख रसूल यांनी छाटणी व इतर मशागती बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.  बाजूच्या ड्रॅगन फ्रूट बागेत सुद्धा पाहणी करण्यात आली. संघाचे अध्यक्ष सुशील बलदवा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत सविस्तर चर्चा होऊन खालील ठराव मंजूर करण्यात आले.  बैठकीत आंब्याचे सद्यपरिस्थितीत करावयाचे मशागती व विक्री व्यवस्था खास पद्धतीने निर्माण करण्याबाबत डॉ. कापसे यांनी सविस्तर विचार मांडले. त्र्यंबक पाथरीकर, शिवाजी उगले, अशोकराव सूर्यवंशी इत्यादीने याविषयी सविस्तर चर्चा करून या वर्षी हे नियोजन करण्यात यावे असे ठरले. बैठकीला सुशील बलदवा, डॉ भगवानराव कापसे, पंडित लोणारे, शिवाजीराव उगले, विश्‍वनाथ दहे, त्र्यंबकराव पाथरीकर, नंदलाल काळे, रमेश अहिरराव, अशोकराव सूर्यवंशी, प्रकाश कापसे व शेख रसूल हे संचालक उपस्थित होते. बैठकीतील ठराव 

  •  मे महिन्यात औरंगाबाद येथे आंबा महोत्सवाचे आयोजन
  •  सभासद संख्या वाढविणे, बँक खाते उघडणे
  •  आंबा पीकविमा योजना निकषात सुधारणा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा
  •  मोहर संरक्षणासाठी वेबिनारचे आयोजन
  •  निर्यात योग्य उत्पादनासाठी वेळोवेळी सदस्यांना मार्गदर्शन करणे
  •  आंबा बागायतदार संघाचा लोगो तयार करणे
  •  पणन मंडळ व्यवस्थापकीय संचालक, मंत्री संदिपान भुमरे यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करणे.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

    Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

    Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

    Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

    Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

    SCROLL FOR NEXT