Keep an eye on Maharashtra
Keep an eye on Maharashtra 
मुख्य बातम्या

विठ्ठला, महाराष्ट्रावर कृपादृष्टी ठेव, शेतकरी, कष्टकऱ्यांना यश दे 

टीम अॅग्रोवन

पंढरपूर, जि. सोलापूर ः विठ्ठला, महाराष्ट्रावर कृपादृष्टी ठेव, कोरोनाचे संकट कायमचे दूर कर, शेतकरी, कष्टकऱ्यांना यश दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. १५) श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजा करताना घातले.  उपमुख्यमंत्री अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पवार दांपत्याचा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी पवार बोलत होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्षा साधना भोसले आदी उपस्थित होते.  उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने राज्यावर आलेले कोरोनाचे संकट कमी होत आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण जगातून कोरोना नाहीसा होवो, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे. चीन, रशिया, युरोपमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आपल्याकडेही आपण काळजी घेत आहोत, प्रत्येक नागरिकांनी योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे. दोन्ही डोस घेतले असले तरी प्रत्येक नागरिकांने मास्कचा वापर केलाच पाहिजे. शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे, ही एक नागरिक म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे.’’ मंदिरे समितीने मंदिर विकासाच्या आराखड्यासह विविध मागण्या केल्या आहेत. त्याबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. 

नांदेडच्या टोणगे दाम्पत्याला महापूजेचा मान  उपमुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून यंदा कोंडिबा टोणगे, पत्नी प्रयागबाई टोणगे (मु. निळा, पो. सोनखेड, ता. लोहा, जि. नांदेड) या वारकरी दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. त्यांचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा प्रवास सवलत पास देण्यात आला. 

अवघी पंढरी दुमदुमली  वारीसाठी पंढरपुरात सुमारे दोन लाखांहून अधिक वारकरी दाखल झाले आहेत. तब्बल वीस महिन्यांनंतर पहिल्यांदाच वारकऱ्यांनी ही वारी अनुभवली. एसटीच्या संपामुळे वारकऱ्यांची गैरसोय झाली. पण खासगी वाहनाने वारकरी पंढरीत दाखल होतच होते. पहाटेपासून चंद्रभागा तिरासह मंदिर परिसरातील प्रदक्षिणा मार्गावर वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानबा-तुकारामच्या अखंड जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली. रात्रीपासून शहरातील विविध मंदिरे, धर्मशाळा, मठांमध्ये कीर्तन, प्रचवनासह भजनाचे सूर आळवले जात होते. भक्तिरसाचा एक वेगळाच उत्साह पंढरीत दाटलेला पाहायला मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT