कर्नाटकचा अर्थसंकल्प ५ जुलैला
कर्नाटकचा अर्थसंकल्प ५ जुलैला 
मुख्य बातम्या

कर्नाटकचा अर्थसंकल्प ५ जुलैला

वृत्तसेवा

बंगळूर : कर्नाटकमधील धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि कॉंग्रेस आघाडीचे सरकार ५ जुलै रोजी आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या राज्य अर्थसंकल्पाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आजपासून (ता. २) कर्नाटक विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनास सुरवात होत असून, राज्यपाल विजूभाई वाला विधानसभेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तरीत्या संबोधित करतील. ३ आणि ४ जुलै रोजी त्यांच्या भाषणावर चर्चा होणार असून, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री एच. डी. कुमारस्वामी ५ जुलै रोजी नवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेब्रुवारी महिन्यात सादर केलेला अर्थसंकल्प कायम ठेवावा, अशी कॉंग्रेसची मागणी आहे. यावरून दोन्ही पक्षांत तणाव निर्माण झालेला असतानाच कॉंग्रेसच्या अर्थसंकल्पात समाविष्ट असलेल्या योजना नव्या अर्थसंकल्पात कायम ठेवल्या जातील, अशी ग्वाही कुमारस्वामी यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT