मुख्य बातम्या

कणेरी मठ येथे २१ पासून सेंद्रिय शेती कार्यशाळा

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील श्री सिद्धगिरी मठाच्या वतीने २१ ते २३ मार्च अखेर सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सेंद्रिय शेतीविषयक सर्व प्रकारचे मार्गदर्शन होणार आहे. मठप्रमुख काडसिद्धेश्‍वर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल.   तीन दिवस चालणाऱ्य शिबिरात डॉ. एल. नारायण रेड्डी यांचे नत्र स्फुरद पालाश पीकसंजीवके कीटकनाशके या विषयावर, अशोक इंगवले यांचे आदर्श गोपालन, अमोल कोळी यांचे उन्हाळ्यासाठी चारानिर्मिती, मोहन मोहिते यांचे सेंद्रिय मिश्र फळबाग जोपासना, अरुण पाटील यांचे गायीचे व्यवस्थापन याविषयी मागदर्शन होइल. याशिवाय डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. एस. आर. राजुरकर, डॉ. आनंद देशपांडे हे तज्ज्ञ आयुर्वेदिक गो उपचार पद्धतीवर शेतकऱ्यांशी संवाद साधतील. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निवास आणि शेतकऱ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा, यासाठी कणेरी मठाशी संपर्क साधण्याचे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment: ‘ॲग्रोवन’ वर्धापन दिनानिमित्त कष्टकरी महिलांचा सन्मान

Farmers Protest: गोंडपिपरीत एमआयडीसी विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

Shaktipeeth Highway Project: ‘शक्तिपीठ’साठी जबरदस्ती मोजणी केल्यास जशास तसे उत्तर देऊ

Mini Tractor Scheme: मिनी ट्रॅक्टर योजनेमुळे महिला बचत गटांची भरारी

Cotton Procurement: परभणी, हिंगोलीत २१.५३ लाख क्विंटलवर कापूस खरेदी

SCROLL FOR NEXT