Modern Farming Techniques: ‘ॲग्रोवन’च्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त धोप येथे ‘कृषी यांत्रिकीकरण’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब आणि यंत्रांच्या वापरामुळे शेती अधिक किफायतशीर व परिणामकारक कशी होऊ शकते, यावर मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले..कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सीमा मंडाळी होत्या. प्रमुख पाहुणे तालुका कृषी अधिकारी (मोहाडी) सुनील भडके यांनी कृषी यांत्रिकीकरण, जमिनीची पूर्वतयारी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले..Women Empowerment: महिला सक्षमीकरणात सातारा जिल्ह्याची मोठी झेप.भंडारा येथील आदित्य एजन्सीचे (जॉन डिअर) संचालक निरजकुमार बैस यांनी ट्रॅक्टर व विविध कृषी उपकरणांचे प्रकार, त्यांचा योग्य वापर आणि खरेदी करताना घ्यावयाची काळजी याची माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथील कृषी यंत्रीकरण तज्ज्ञ योगेश महाले यांनी यंत्रांद्वारे मशागत केल्यास होणारे फायदे, खर्च बचत आणि उत्पादनवाढ यावर मार्गदर्शन केले. .Women Empowerment: महिलांचा पंचायत ते संसद प्रवास सोपा होईल : मोदी.कृषी सहाय्यक अधिकारी (धोप) रौशनी बाराई यांनी सूत्रसंचालन केले. पंचायत समितीचे सभापती जगदीश शेंडे यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीपासून व्यावसायिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात शांतिगंगा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष हेमंत पिकलमुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद सपाटे यांनी सहकार्य केले. उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना आधुनिक व प्रगत शेती तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले..वर्धापन दिनानिमित्त ‘शेतीपासून थेट चुलीपर्यंत’ या संकल्पनेतून ५ शेतकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. यात सीमा रामराव मंडारी. संगीता भूषण मोहनकर, गार्गी हेमंत पिकलमुंडे, रंजू जगदीश सापाटे आणि उषा हरिचंद्र निमकर यांचा गौरवचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शांतिगंगा शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकारी हेमंत पिकलमुंडे, गजानन सोमनाथे तसेच ॲग्रोवन वितरण प्रतिनिधी नवीन कामठे यांनी विशेष परिश्रम घेतले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.