Land Acquisition Issues: गोंडपिपरी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राविरोधात गुरुवारी (ता.२३) तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. .करंजी, वढोली, चेक पेल्लूर, वडकुली, चक वडकुली, सिरसी देऊळवार, चक बेरडी, बोरगाव, धानापूर, चेक बोरगाव, लिखितवाडा व खरारपेठ या १२ गावांतील हजारो शेतकरी, शेतमजूर, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..Farmers Protest: कोकणातील बागायतदारांच्या समस्यांबाबत राजू शेट्टींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, मुंबईतील धडक मोर्चाला पाठिंबा.तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, उद्योगमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला, की जमीन हिरावून घेण्याचा कुठलाही डाव सहन केला जाणार नाही. .Farmers Protest: गहू खरेदीला विलंब, शेतकरी संघटनांकडून पंजाबमध्ये १७ एप्रिलला 'रेल्वे रोको' आंदोलन.प्रस्तावित प्रकल्पामुळे सुपीक शेती जमीन नष्ट होणार, जलस्रोतांवर प्रचंड ताण येणार, तसेच पर्यावरणीय प्रदूषण व मोठ्या प्रमाणावर विस्थापनाचा धोका निर्माण होणार असल्याचे आंदोलकांनी ठामपणे मांडले. .याशिवाय, भूसंपादन प्रक्रियेत आवश्यक असलेल्या सामाजिक व पर्यावरणीय परिणाम अहवालात पारदर्शकतेचा अभाव सार्वजनिक सुनावणी केवळ औपचारिकतेपुरती आहे. आमची संमती न घेता जमीन घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा आमच्या मूलभूत हक्कांवर थेट आघात आहे. ‘मोबदला नको, पण जमीनही देणार नाही,’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.