जळगाव जिल्ह्यात केळीला थंडीचा फटका
जळगाव जिल्ह्यात केळीला थंडीचा फटका 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात केळीला थंडीचा फटका

टीम अॅग्रोवन

जळगाव : डिसेंबरसह या महिन्यात केळीला प्रतिकूल ठरणारी थंडी राहील्याने सुमारे २५ हजार हेक्‍टरवरील पिकाला जबर फटका बसला आहे. केळीचे आगार असलेल्या रावेरात केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी नुकतीच नुकसानीसंबंधी पाहणी केली. 

एक ते तीन महिन्यांच्या केळी बागांमध्ये पाने काळी, पिवळी पडली असून, एक महिन्याची रोपे पुरती पिवळी पडून वाया गेली आहेत. अशा लहान केळी बागेत नांग्या भराव्या लागतील, अशी स्थिती आहे. चोपडा व शिरपूर (जि. धुळे) तालुक्‍यात ही समस्या तापी काठावरील गावांमध्ये अधिक आहे. रावेरात निसवणीवरील केळी बागांमध्ये घड अडकणे, आखूड केळीची समस्या दिसून आली आहे. रावेरातील चिनावल, वाघोदा, सावदा व परिसरात तज्ज्ञांनी नुकतीच पाहणी केली असून, करपा रोगामुळे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

तज्ज्ञांनी नुकसानीचे क्षेत्र किती असेल, असे स्पष्टपणे सांगितले नसले, तरी रावेरमधील केळीखालील कमाल क्षेत्राला थंडीचा फटका बसल्याची पुष्टी दिली. पाहणी करणाऱ्या तज्ज्ञांमध्ये केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ के. बी. पवार यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत कृषी विभागातील अधिकारी होते. तापमान नियंत्रणासाठी केळीला रात्री किंवा पहाटे सिंचन करा, केळीभोवती वारा अवरोधक असावेत, रात्री केळीभोवती शेकोट्या किंवा धूर करा, असे काही सोपे उपाय तज्ज्ञांनी सुचविले. ज्या बागांमध्ये आच्छादन आहे व करपा नियंत्रणासंबंधी खते व पाणी व्यवस्थापन केले, त्या बागांमध्ये करपा रोगाला अनेक शेतकऱ्यांनी थोपविल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

रावेरात सुमारे १५ ते १७ हजार हेक्‍टर, मुक्ताईनगर व यावलमध्ये सहा हजार हेक्‍टर आणि चोपडा व शिरपूर आणि शहादा (जि. नंदुरबार) मधील सुमारे चार हजार हेक्‍टवरील केळीवर करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे सांगितले जात आहे. 

करपा निर्मूलन कार्यक्रम राबवा जळगाव जिल्ह्यात केळीवरील करपा नियंत्रणासाठी शासनाच्या कृषी विभागातर्फे २०१५ पर्यंत शेतकऱ्यांना निविष्ठांचे ९० टक्के अनुदानावर वितरण केले जात होते. २० ते २२ हजार हेक्‍टर क्षेत्रावर या संदर्भातील कार्यक्रम राबविणे शक्‍य व्हायचे. परंतु हा कार्यक्रम शासनाने बंद केला असून, यामुळे शेतकरी संयुक्तपणे करपा निर्मूलन मोहीम राबवित नसल्याचे समोर आल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT