Jumbo Covid Hospital closed after Monday: Pawar
Jumbo Covid Hospital closed after Monday: Pawar 
मुख्य बातम्या

जम्बो कोविड रुग्णालय सोमवारनंतर बंद : पवार

टीम अॅग्रोवन

पुणे ः ‘‘जिल्ह्यातील कोविड संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात येत आहे. त्यामुळे शिशू वर्गातील मुलांचे शिक्षण सुरू करावे. जम्बो कोविड रुग्णालय येत्या २८ फेब्रुवारीनंतर बंद करावे’’, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. 

विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी (ता.२६) झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘जम्बो कोविड रुग्णालय बंद केल्यानंतर तेथील परिसर पूर्ववत करावा. रुग्णालयातील साहित्य पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात उपयोगात आणले जावे. कोविड संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी मास्कचा वापर करावा. उद्यान आणि दुकानांच्या वेळा पूर्वीप्रमाणे कराव्यात. ग्रामीण भागात ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचे प्रमाण वाढवावे.’’ 

 राव म्हणाले, ‘‘जिल्ह्यात गेल्या ७ दिवसांत नवीन रुग्णांच्या संख्येत ५१ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणात ८५ लाखाने, तर १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणात ४९ हजाराने वाढ झाली. जिल्ह्याने १ कोटी ७२ लक्ष लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. ६० वर्षांवरील ५८ टक्के व्यक्तींना बूस्टर डोस देण्यात आला.’’  जिल्हा परिषदेच्या गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण मंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

सक्शन यंत्राचा प्रभावी वापर करून, गाव आणि शिवार स्वच्छ सुंदर ठेवा. असे आवाहन पवार यांनी केले. विधानभवन परिसरात जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींना सक्शन यंत्रणेचे पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता.२६) वितरण करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT