सिंचन परिषदेचा समारोप
सिंचन परिषदेचा समारोप 
मुख्य बातम्या

विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणार

टीम अॅग्रोवन

सोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता. १४) १९ व्या राज्य सिंचन परिषदेचा समारोप करण्यात आला. पुढील राज्यस्तरीय सिंचन परिषद अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात घेण्याच्या ठरावासह विविध ठराव या परिषदेत घेण्यात आले.

१९ व्या राज्यस्तरीय सिंचन परिषदेच्या समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश काळे होते. या वेळी गोपीनाथ मुंडे संशोधन केंद्राचे संचालक डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. सुधीर भोंगळे, ज्‍येष्ठ वैज्ञानिक दिलीप पोकळे, शेतकरी संघटनेचे अमर हबीब, जैन उद्योग समूहाचे डॉ. बी. डी. जडे, सिंचन सहयोगचे उपाध्यक्ष बापू अडकीने, डॉ. संजय साळुंके, भूगोल विभागाचे डॉ. मदनलाल सूर्यवंशी उपस्थित होते. महाराष्ट्र सिंचन सहयोग, अजिंठा शिक्षण संस्था आणि जैन उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव येथे सिंचन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

परिषदेच्या समारोप सत्रात राज्य सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे यांनी ठराव मांडले. या वेळी श्री. ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. सिंचन परिषदेतंर्गत वनस्पतीशास्र आणि भूगोल विभागाच्या राष्ट्रीय चर्चासत्राचाही समारोप डॉ. दिलीप पोकळे यांच्या भाषणाने करण्यात आला. आभार प्राचार्य डॉ. अशोक नाईकवाडे यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष तांदळे यांनी केले.   परिषदेतील प्रमुख ठराव

  • २० वी राज्य सिंचन परिषद अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात घ्यावी.
  • सोयगाव येथील वेताळवाडी धरणावरील झुडपे लोकसहभागातून काढणे.
  • यापुढे सिंचन सहयोगची शाखा काढण्यासाठी नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. १९ व्या सिंचन परिषदेत सहभागी झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या जिल्ह्यात सिंचन सहयोगची शाखा नसल्यास त्या ठिकाणी शाखा उघडणे.
  • सोयगावला स्वागताध्यक्ष रंगनाथ काळे यांच्या अधिपत्याखाली सिंचन सहयोगची शाखा उघडणे.
  • सोयगाव तालुका शाखेने राज्य सहयोग सिंचन शाखेशी सतत संपर्क ठेवावा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

    Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

    Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

    Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

    Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

    SCROLL FOR NEXT