भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के संपत्ती !
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के संपत्ती ! 
मुख्य बातम्या

भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के संपत्ती !

टीम अॅग्रोवन

दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण झालेल्या संपत्तीपैकी तब्बल ७३ टक्के संपत्ती ही देशातील एक टक्का श्रीमंत लोकांनाच प्राप्त झाली आहे. यातून देशातील वाढत्या उत्पन्नातील असमानतेची पातळी ही किती चिंताजनक आहे याचे चित्र स्पष्ट करते, अशी धक्कादायक ‘आॅक्सफॅम’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे अाली आहे.  लोकसंख्येच्या सर्वात गरीब जनतेपैकी ६७ कोटी भारतीयांच्या संपत्तीत मात्र केवळ १ टक्क्यानीच वाढ झाली आहे. हे सर्वेक्षण जगभरातील श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांच्या वार्षिक उत्पन्नाच्या वाढत्या आणि सामान्य लोकांच्या उत्पन्नाच्या घटत्या स्थितीला समोर आणणारे ठरले आहे. जगातील १० देशांमधील ७० हजार लोकांची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. भारतातील ३७ टक्के अब्जाधीशांकडे वारसा हक्काने संपत्ती आल्याचे अहवालातून समोर आले आहे. गेल्या वर्षभरातील तयार झालेल्या एकुण संपत्तीपैकी ८२ टक्के वाटा १ टक्का लोकांकडे गेला आहे. तर लोकसंख्येच्या ३ अब्ज ७० लाख लोकांच्या संपत्तीमध्ये काहीच वाढ झाली नाही. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर अहवाल दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर  हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगातील सर्व देशांच्या प्रतिनिधींना जागतिक पातळीवरील संपत्ती वाटप आणि लिंग असमानतेची कल्पना यावी आणि या मुद्यांवर फोरममध्ये चर्चा व्हावी, यासाठी हा अहवाल प्रसिद्ध केल्याचे या संस्थेने म्हटले आहे.  भारताच्या अर्थसंकल्पाएवढी वाढ गेल्या वर्षी या संस्थेने प्रसिध्द केलेल्या अहवालात भारतातील एक टक्का लोकांकडे ५८ टक्के संपत्ती होती. हा आकडा जागतिक पातळीपेक्षा कमी होता. जागतिक ५० टक्के संपत्ती एक टक्का लोकांकडे होती. तर गेल्या वर्षी २०१७ मध्ये देशातील एक टक्का लोकांच्या संपत्तीत २०.९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली होती. ही वाढ देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाएवढी आहे, असे आॅक्सफॅमने म्हटले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT