Increasing income through projects The objective will be achieved: Bhuse
Increasing income through projects The objective will be achieved: Bhuse 
मुख्य बातम्या

प्रकल्पांद्वारे उत्पन्नवाढीची उद्दिष्टपूर्ती होईल ः भुसे

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘‘संपूर्ण सिंचन क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यासाठी खुले कालवे बंद नलिकांमध्ये रूपांतरित केल्यास फायदा होईल. उघडे कालवे बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. दहिकुटे प्रकल्पासाठी ७.३६ कोटी व बोरी अंबेदरी लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी १७.८८ कोटी अशा एकूण २५.२४ कोटींना प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. या प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीची उद्दिष्टपूर्ती होईल,’’ असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. 

या प्रकल्पास शासनाने दिलेल्या मंजुरीनंतर संबंधित विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत भुसे बोलत होते. बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी वाय. जी. पगार, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, शाखा अभियंता ए. बी. बोरसे, संजय दुसाने, संजय हिरे, सुनील चिकणे, दीपक देसले आदी उपस्थित होते.

खडकाळ जमिनीत पाणी गळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प म्हणून लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीस शासनाने प्रथमच मंजुरी दिली. या प्रकल्पाचे काम करण्यापूर्वी सर्व तांत्रिक बाबी तपासून अभ्यासपूर्ण नियोजन करावे, अशा सूचना भुसे यांनी दिल्या.

जुन्या धरणांचा पाईपबंद कालव्याचा प्रकल्प प्रथमच राबविण्यात येत आहे. जुन्या प्रकल्पांचे देखील सर्वेक्षण करण्यात येईल. अशा प्रकल्पांवरील देखभाल दुरुस्तीचा खर्च मर्यादित राहण्यासाठी सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून सर्वसमावेशक अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी या वेळी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

The Economist : इकॉनॉमिस्टच्या नजरेतून दक्षिण व उत्तर भारत

Urja Bio System : शाश्‍वत ऊर्जेसाठी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ची साथ

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

SCROLL FOR NEXT