नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर असलेल्या पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे पाच ते सहा कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने गुरुवारी (ता. २१) छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. व्यापाऱ्यांची कार्यालये, निवासस्थानावर छापे टाकत कसून चौकशी केली जात असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे कांदा दरात सुधारणा होत असताना पडणाऱ्या धाडींमुळे चर्चांना उधाण आले आहे.
कांद्याचा पुरवठा घटल्याने दरात सुधारणा होत असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर आयकर विभागाने प्रतिष्ठित कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्याने पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. आयकर विभागाच्या सात ते आठ जणांच्या पथकाने सकाळपासून संबंधित व्यापाऱ्यांची गोदामे, कार्यालय, निवासस्थाने आदी ठिकाणी झाडाझडती करण्यात आली. यात प्रामुख्याने कांदा खरेदीच्या पावत्या, कांद्याच्या विक्रीची बिले, बँक व्यवहार आदींसह कर भरणा संबंधी कागदपत्रांची कसून चौकशी केल्याचे समजते आहे. अचानक टाकलेल्या धाडीचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पार्श्वभूमीवर काही काही अंशी कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात काही काळ लिलाव बंद झाला होता. संबंधित व्यापाऱ्यांवर धाडी पडल्याचे समजल्यानंतर व्यापारी लिलावातून बाहेर पडल्याचे समजते. उन्हाळी कांद्याला गुरुवारी (ता. २०) सरासरी ३०५१ निघाले तर शुक्रवारी (ता. २१) दरात घसरण होऊन सरासरी २८०० रुपये दर निघाले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.