सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार पुनर्वसनावर भर  Including increasing the area of irrigation Emphasis on quality rehabilitation
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार पुनर्वसनावर भर  Including increasing the area of irrigation Emphasis on quality rehabilitation 
मुख्य बातम्या

सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार पुनर्वसनावर भर 

टीम अॅग्रोवन

अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच आता पूर्णेच्या खोऱ्यातील टेंभा गावाजवळ पेढी नदीवर पेढी बॅरेज उपसा सिंचना योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. विविध प्रकल्पांना चालना देऊन जिल्ह्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.  चांदूर बाजार तालुक्यातील राजुरा गावाजवळील राजुरा नाल्यावरील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी १९३ कोटी ८१ लाख रुपये किंमतीला सुधारित प्रशासकीय मान्यता नुकतीच मिळाली. त्याचबरोबर आता पेढी उपसा सिंचन योजनेच्या ३६१ कोटी ६१ लक्ष रूपयांच्या प्रकल्पाला मान्यता मिळाल्याने ही महत्वाची कामे वेग घेणार आहेत. प्रकल्प उभारताना ते काम दर्जेदार होण्यासह पुनर्वसनाची कामेही उत्तम व्हावीत, असे उद्दिष्ट आहे. दर्जेदार पुनर्वसनासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, असे राज्यमंत्री कडू यांनी सांगितले. 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये  तापी खोऱ्यातील पूर्णा उपखोऱ्यात टेंभा गावाच्या पूर्वेस पेढी नदीवर पेढी बॅरेज उपसासिंचन योजना प्रस्तवित करण्यात आली. या बॅरेजची एकूण साठवण क्षमता ४.६५ दलघमी इतकी आहे. जिवंत पाणीसाठा ४.६० असून मृत पाणीसाठा ०.०५ दलघमी आहे. बॅरेजची लांबी १२० मी. इतकी असून १२६.५० मीटर आकाराचे उभी उचल पद्धतीने आठ दरवाजे राहणार आहेत. बॅरेजच्या पायाच्या ठिकाणी परागम्य मऊ भूस्तर असल्याने बॅरेज डिफॉर्गम वॉलसह रूफ फाउंडेशनवर प्रस्तावित आहे. डाव्या तिरावर १०० मी. लांबीचा व उजव्या तिरावर ८१ मीटर लांबीचा माती भराव प्रस्तवित आहे. दोन्ही बाजूस महत्तम उंची ९.५० मीटर इतकी आहे. प्रकल्पाचा लाभ सात गावांतील २ हजार २३२ हेक्टर शेतीला, तसेच पेयजल व मत्स्य व्यवसायाला मिळणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT