बोंड अळी निर्मूलनासाठी सूचनांची अंमलबजावणी करा
बोंड अळी निर्मूलनासाठी सूचनांची अंमलबजावणी करा 
मुख्य बातम्या

बोंड अळी निर्मूलनासाठी सूचनांची अंमलबजावणी करा

टीम अॅग्रोवन

नांदेडः शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा. बेकायदेशीर कीटकनाशके आढळून आल्यास विक्रेत्यावर कडक कारवाई करावी. कृषी विभागाने बोंड अळी नियंत्रणाबाबतची सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवावी. कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर बोंड अळी नियंत्रणाची माहिती दर्शनी भागावर लावण्यात यावी. जिनिंग प्रेसिंग मालकांनी बोंड अळी निर्मूलनासाठी सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये बुधवारी (ता. १) गुलाबी बोंड अळी निर्मूलन आणि कीटनाशकांची सुरक्षित हाताळणी कार्यशाळेमध्ये श्री. डोंगरे बोलत होते. या वेळी जि.प.चे मुख्य कार्यकरी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रुईकर, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. के. एस. बेग, डॉ. ए. डी. पंडागळे, डॉ. एस. एम. तेलंग, ‘माफदा’चे सचिव बिपीन कासलीवा, बियाणे, खते, कीटकनाशके विक्रेता संघटनेचे सचिव दिवाकर वैद्य आदींसह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका अधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोंड अळी निर्मूलनाबाबत डॉ. बेग, डॉ. पंडागळे, डॉ. तेलंग यांनी सविस्तर माहिती दिली. डॉ. रुईकर यांनी कीटकनाशकांची हाताळणी करताना घ्यावयाची काळजी, विषबाधा झाल्यास करावयाचे उपाय याबाबत माहिती दिली. श्री. चलवदे म्हणाले, की बोंड अळी निर्मूलनासाठी शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रचार, प्रसिद्धी करावी. जिनिंग व्यवस्थापकांनी सवलतीच्या दरात सापळे उपलब्ध करून देण्यात यावेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT