Immediate disposal of pending Pokra cases: Malo 
मुख्य बातम्या

‘पोकरा’ची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढा : मालो

परभणी : ‘‘कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अधिक तत्परतेने शेतकऱ्यांची प्रकरणे निकालात काढावीत’’, अशा सूचना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक इंद्रा मालो यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यात दिल्या.

टीम अॅग्रोवन

परभणी : ‘‘कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अधिक तत्परतेने शेतकऱ्यांची प्रकरणे निकालात काढावीत’’, अशा सूचना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक इंद्रा मालो यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यात दिल्या. 

मालो म्हणाल्या, ‘‘पोकरा प्रकल्पामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यास मदत मिळत आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांबरोबर शेतकरी व महिला गट तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रकल्पाच्या आर्थिक साह्याने शेतीमध्ये व्यावसायिकता वाढविण्यास सुरुवात केली आहे. बहुतांशी गावांचा बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांचा असाच प्रतिसाद राहिला, तर प्रकल्पाच्या उद्देशानुसार ही गावे अधिक सक्षम बनतील. त्यामुळे कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरील मंजुरीसाठी होत असलेल्या विलंबाचा कालावधी कमी करण्याची आवश्यकता आहे.’’   

मराठवाड्यातील परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतील कामांची पाहणी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेण्यासाठी नुकताच प्रक्षेत्र दौरा मालो यांनी केला. यामध्ये परभणीचे जिल्हाधिकारी, मुंबई येथील प्रकल्प कार्यालयातील विशेषज्ञ, तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दौऱ्यामध्ये परभणी जिल्ह्यातील धानोरा काळे, केकरजवळा या गावांना भेटी देऊन शेड नेटमधील टोमॅटो, मिरची पिकांची लागवड, पॉलिहाउसमधील जरबेरा लागवड, ठिबक सिंचन आणि पेरू लागवड इत्यादी कामांची पाहणी केली. नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक कंपनीच्या स्वयंचलित पॅकिंग युनिटला आणि स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या हळद, मिरची व धने या शेतीमालावर प्रक्रिया करून मसाले उद्योग उभारणी केलेल्या उत्पादक कंपनीच्या कामाची पाहणी करण्यात आली.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT