The honesty of the onion grower
The honesty of the onion grower 
मुख्य बातम्या

कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणा

टीम अॅग्रोवन

नाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची काही जण ओरड करीत असले, तरी दुसऱ्या बाजूला प्रामाणिक माणसेही आहेत. याचाच प्रत्यय नाशिक जिल्ह्यातील ताहाराबाद (ता. सटाणा) येथील शेतकऱ्याने कांदा विक्रीपोटी व्यापाऱ्याकडून अधिकचे आलेले रोख २० हजार रुपये परत केल्याने आला. याबद्दल बाजार समिती व्यवस्थापनाने शेतकऱ्याच्या या व्यवहाराचा सन्मान केला आहे. 

सविस्तर माहिती अशी, की ताहाराबाद येथील कांदा उत्पादक पांडुरंग बाबाजी साळवे यांचा २८ क्विंटल कांदा त्यांचा मुलगा नितीन याने ३१ मे रोजी उमराणे (ता. देवळा) येथील श्री रामेश्‍वर कृषी मार्केट या खासगी बाजार समितीत विक्रीसाठी आणला. या कांद्याला लिलावात प्रतिक्विंटल १,४३५ रुपयेप्रमाणे बोली लागली. हिशेबपट्टी होऊन त्यापोटी ३६ हजार ३७७ रुपये रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र येथील रेणुका अडत दुकानाच्या रोखपालाकडून ५६ हजार ३७७ रुपये इतकी रक्कम नजरचुकीने दिली गेली. ही रोख रक्कम घेऊन नितीन घरी आले. त्या वेळी रक्कम मोजली असता २० हजार रुपये जास्त आल्याचे लक्षात आले. त्यांच्या वडिलांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी अधिकचे पैसे परत करा, अशी सूचना केली. 

यावर नितीन व त्यांचे भाऊ गजानन यांनी  बाजार समितीला हा प्रकार कळविला. व्यापाऱ्याकडे पुन्हा ही रक्कम परत करत प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे. पांडुरंग साळवे हे सटाणा न्यायालयाचे सेवानिवृत्त सहायक अधीक्षक आहेत. शिस्त, प्रामाणिकपणा त्यांच्यात आहे. त्यामुळेच लोभ न ठेवता त्यांनी पैसे बाजार समितीमार्फत परत केले. व्यवस्थापनाकडून त्यांचा मुलगा नितीन यांचा मुख्य संचालक श्रीपाल ओस्तवाल यांच्या हस्ते सत्कार केला. या वेळी कांदा व्यापारी, शेतकरी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

फुकटचा पैसा नको, कष्टाचा पैसा हवा. आपण कष्टाने केलेले दोन पैसे जीवनात , समाधान देणारे असतात. त्यामुळे या भावनेतून पैसे परत केले.  - पांडुरंग साळवे, कांदा उत्पादक शेतकरी

आमच्याकडून पैसे जास्त देण्यात आले. कुणाला जास्त पैसे गेले हे माहीत पण नव्हते. मात्र, या शेतकऱ्याने स्वतः संपर्क करून पैसे परत दिले. त्यामुळे असे शेतकरी आदर्शवत आहेत.  - संतोष पांडे, रेणुका आडत दुकान, उमराणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT