हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये बुधवारी (ता. ५) हळदीची सुमारे १००० क्विंटल आवक होती. हळदीला प्रति क्विंटल किमान ७४०० ते कमाल १०००० रुपये, तर सरासरी ८७०० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. देशातील हळदीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थानिक परिसरातून तसेच शेजारील परभणी, नांदेड, विदर्भातील यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांतून आवक होत आहे. हळद मार्केट यार्डावर आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, अशी तीन दिवस हळदीची आवक घेतली जाते. बुधवारी (ता. ५) हळदीला प्रतवारीनुसार हळद काडी नं. १ प्रति क्विंटल १०००० रुपये, हळद नं. २ ला प्रति क्विंटल ८००० ते ९३५० रुपये, तर सरासरी ८५५० रुपये दर मिळाले. हळद (डंकी) प्रति क्विंटल किमान ७४०० ते ८५२० रुपये, तर सरासरी ७६५९ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता.३) हळदीची १२०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ८००० ते कमाल ९०२० रुपये, तर सरासरी ८५२५ रुपये दर मिळाला. शुक्रवारी (ता.३१) हळदीची ६८५ क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ७५०० ते कमाल ८५०० रुपये, तर सरासरी ८००० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २९) हळदीची ८०० क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान ७२५० ते कमाल ८३९० रुपये, तर सरासरी ७८२० रुपये दर मिळाले. चांगले दर मिळत असल्याने हळदीची आवक वाढत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.