पुण्यातील पश्चिम तालुक्यांत हायअलर्ट...
पुण्यातील पश्चिम तालुक्यांत हायअलर्ट... 
मुख्य बातम्या

पुण्यातील पश्चिम तालुक्यांत हायअलर्ट...

टीम अॅग्रोवन

पुणे : अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पश्चिम तालुक्यांत जोरदार वाऱ्यासह, पाऊस पडण्याचा इशारा आहे. या भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड तालुक्यांमध्ये काही ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. इतर तालुक्यातही प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

अरबी समुद्रात आलेले निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या किनाऱ्याजवळ महाराष्ट्राला धडकणार आहे. कोकण किनारपट्टीसह मध्यमहाराष्ट्रातील जिल्ह्यांना फटका बसण्याचा शक्यता आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी आणि खेड तालुक्यांतील पश्चिम भाग या भागात अतिदक्षतेचा तर पुरंदर, हवेली, शिरूर, पूर्व खेड, आंबेगाव, जुन्नर येथे दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्या भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, त्या भागातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांसह, पोलीस, वन, महावितरण, नगरपालिका, जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बैठक घेऊन नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्या इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांकडून मंगळवारीच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. डोंगराकडील ज्या भागात जोरदार वारे वाहणार आहे, तर सखल भागात पाणी साठण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी तत्काळ खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. वादळात कुठल्याही प्रकारची जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी , सरपंच, तलाठी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचे आदेश वादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा इशारा दिलेल्या तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील यंत्रणा सज्ज ठेवण्याबरोबरच, प्रत्येक तालुक्यात पाच रुग्णवाहिका तयार ठेवाव्यात. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दलाचे स्वयंसेवकांनी सतर्क रहावे, असे आदेश देण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT