Heavy rains in Nevasa, Pathardi, Shevgaon
Heavy rains in Nevasa, Pathardi, Shevgaon 
मुख्य बातम्या

नेवासा, पाथर्डी, शेवगावला जोरदार पाऊस

टीम अॅग्रोवन

नगर ः नगर जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत विविध भागात पावसाने हजेरी लावली. नेवासा, पाथर्डी, शेवगाव व कर्जत तालुक्यात मात्र जोरदार पाऊस झाला. या पावसाने कापसाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. बोधेगाव (ता. शेवगाव) येथील नदीला मोठा पूर आल्याने शेवगाव-गेवराई रस्ता पाच तास बंद होता.

सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंत सुमारे ३५ महसूल मंडळांत पावसाने हजेरी लावली. पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. नगर जिल्ह्यात सोमवारी काहीशी उघडीप दिली असली तरी दोन दिवस जोरदार पाऊस झाला. रविवारी कर्जत, शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यासह नगर तालुक्यातही पाऊस झाला.

सर्वाधिक पाऊस शेवगाव, पाथर्डी तालुक्यात झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका कापसाला बसला आहे. एेन वेचणीला आलेला कापूस भिजल्याने मोठे नुकसान झाले. बोधेगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे बोधेगाव येथील नदीला रविवारी उशिरा पूर आल्याने गेवराईकडे जाणारा रस्ता पाच तास बंद होता. कर्जत तालक्यातही पावसाने कांदा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.

सोमवार सकाळपर्यंतच्या नोंदीनुसार बोधेगाव, शेवगाव, चापडगाव, टाकळी, कोरडगाव मंडळात अतिवृष्टी झाली. अन्य मंडळातही पावसाचा जोर अधिक होता. सकाळपर्यंत झालेली पावसाची नोंद अशी ः खर्डा ः ३६, नायगाव ः ५७, शेवगाव ः ६६, भातकुडगाव ः ४१, बोधेगाव ः ९७, चापडगाव ः ११६, ढोरजळगाव ः ६२, एरंडगाव ः ६०, पाथर्डी ः ४५, माणिकदौडी ः ५०, टाकळी ः ६९, कोरडगाव ः ८४, करंजी ः ३२, मिरी ः २४, सलाबतपुर ः ३३, कुकाणा ः ३९, नेवासा बुद्रुक ः २४, वडाळा ः २४, चांदा ः १६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT