Heavy rains lashed Sangli district
Heavy rains lashed Sangli district 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

टीम अॅग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. चांदोली धरण परिसरात हलक्या पावसाच्या झरी पडल्या. शिराळा तालुक्यात १९ मिलिमीटर तर जिल्ह्यात ३.८४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. वारणा धरणातून विद्युत गृह आणि सांडव्यातून ६०९३ क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा नदीच्या पाण्याची पातळी स्थिर आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना मोठा दिसाला मिळाला आहे. चांदोली धरणाची क्षमता ३४.४० टीएमसी इतकी असून सध्या २९.८८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. बुधवारी (ता. १२) सकाळपासून सर्वदूर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्याच्या पश्चिम भागात म्हणजे मिरज, वाळवा, शिराळा यासह कडेगाव, पलूस या तालुक्यात थांबून थांबून मध्यम पावसाच्या सरी बसरत होत्या. बुधवारी (ता. १२) सकाळी नोंदवल्या गेलेल्या आकडेवारी नुसार चोवीस तासांत ३.८४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

आटपाडी तालुक्यात एकाही मिलिमीटर पावसाची नोंद झाली नाही. मिरज, जत आणि पलूस तालुक्यांत १ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. खानापूर तालुक्यात ०.६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय १ जूनपासून आजअखेर पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) मिरज ः ३३७.१, तासगाव ः ३०५.२, कवठेमहांकाळ ः३७१.९, वाळवा-इस्लामपूर ः ३७०.१, शिराळा ः ८६१, कडेगाव ः ३१०.७, पलूस ः २६२.५, खानापूर-विटा ः ४१०, आटपाडी ः २६४.३, जत ः २११.७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT