Heavy rains in Aurangabad, Latur
Heavy rains in Aurangabad, Latur 
मुख्य बातम्या

औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळ

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबादमधील आठ व लातूरमधील तीन मिळून ११ मंडळांत अतिवृष्टी झाली. तर, लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना या पाच जिल्ह्यातील १९६ मंडळांत पावसाने तुरळक, हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लावली. यंदा पाऊस मराठवाड्यावर मेहरबान असल्याचे चित्र आहे. 

मध्यंतरीचा काही काळ वगळता पावसाची दमदार हजेरी कमी-अधिक प्रमाणात अनेक मंडळांत लागली. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ५१ मंडळांत पाऊस झाला. बनोटी करंजखेड, सिद्धनाथ वडगाव, वाळूज, तुर्काबाद, भेंडाळा, मांजरी, गंगापूर या आठ मंडळांत अतिवृष्टीने चांगलाच धुमाकूळ घातला. तर, इतर ४३ मंडळांत हलका ते दमदार पाऊस झाला. गंगापूर तालुक्यातील नऊपैकी तब्बल सहा मंडळांत अतिवृष्टी झाली. 

लातूर जिल्ह्यातील ४७ मंडळांत पाऊस झाला. हेर, भातमुंगळी, औराद या तीन मंडळांत अतिवृष्टी झाली. इतर ४४ मंडळांत हलका पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ४६ मंडळांत तुरळक ते दमदार पावसाची हजेरी लागली.

सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला कोंब फुटले. शिवाय काही भागात काढलेल्या व काढणीला आलेल्या उडदलाही पावसाने दणका दिला. काही ठिकाणी पुरामुळे पिकच वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. दुसरीकडे परतीच्या वाटेवरील पाऊस रब्बीसाठी मोठा दिलासा देणारा ठरतो आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT