Hawaman
Hawaman 
मुख्य बातम्या

राज्यात वादळी पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २६) उद्या (ता. २७) राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर कोकणात अनेक भागांत पावसाने उघडीप दिली होती. राजस्थानपासून बिहारपर्यंत असलेल्या हवेचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकून पाकिस्तान आणि बिहारपर्यंत विस्तारला आहे. तर बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने बिहार, आसाम, मेघालयासह पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. तर उत्तर महाराष्ट्र परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. 

आज (ता. २६) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, तर विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : 

मध्य महाराष्ट्र : नगर २०, श्रीरामपूर १८, अंमळनेर १४, पारोळा २२, अक्रणी १२, गिरणाधरण ८६, इगतपुरी १४, मालेगाव २८. 

मराठवाडा : औरंगाबाद ५६, गंगापूर ३४, सोयगाव १५, आष्टी १६ आंबड ५५, बदनापूर ३०, भोकरदन २२, बिलोली १८, हिमायतनगर ३५, लोहा ४०, उमरी २४. 

विदर्भ : अकोला १२, चांदूरबाजार ११, पवनी १४, संग्रामपूर २३, सिंदखेड राजा १२, चिमूर १४, भिवापूर १२, हिंगणा १८, कामठी ३८, कुही १५, नागपूर ६०, पारशिवणी २२, उमरेड १३, हिंगणघाट १०, मारेगाव ११. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT