कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार
कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार  
मुख्य बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार

टीम अॅग्रोवन

पुणे: ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून जोर धरलेल्या पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. सोमवारी (ता. ९) महाबळेश्‍वर येथे सर्वाधिक १३६ मिलिमीटर; तर लांजा येथे १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर ओसरला असला तरी आज (ता. १०) कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार; तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  मध्य भारतात असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकून मध्य प्रदेशात आले आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रताही कमी होत आहे. सोमवारी (ता.९) दुपारी उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात ढगांची दाटी होती. तसेच हलक्या ते जोरदार सरी येत होत्या. आज (ता.१०) मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकण्याची शक्यता असल्याने पावसाचा जोरही ओसरणार आहे. गुजरातपासून केरळपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य आहे, उर्वरित राज्यात मात्र पाऊस काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.      सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये स्रोत - हवामान विभाग) :   कोकण : जव्हार ८१, पालघर ६७, तलासरी ७२, विक्रमगड ७२, वाडा ७३, चिपळूण ६८, दापोली ७७, गुहागर ६७, खेड ७०, लांजा १२०, मंडणगड ५५, कल्याण ५१, शहापूर ६०, उल्हासनगर ५०. मध्य महाराष्ट्र : साक्री ४९, शिरपूर ५७, चंदगड ४३, राधानगरी ९३, शाहूवाडी ४५, इगतपुरी ६५, लोणावळा कृषी ६७, महाबळेश्वर १३६. मराठवाडा : सिल्लोड ५१. विदर्भ : पातूर ३९, पारशिवनी ३३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT