महाराष्ट्राचा ताप आेसरेना...
महाराष्ट्राचा ताप आेसरेना... 
मुख्य बातम्या

महाराष्ट्राचा ताप आेसरेना...

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने उष्णतेची लाट आली आहे. बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा सातत्याने ४३ अंशांच्या पुढे आहे. बुधवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारपर्यंत (ता.३) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असून, राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४३ ते ४४ अंश राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.   एप्रिल महिन्यात वाढलेला उन्हाचा चटका कायम अाहे. राजस्थानमधील फालोदी येथे देशातील उच्चांकी ४७.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रातही उन्हाच्या झळा वाढतच असून, गेले काही दिवस बहुतांशी ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदले जात आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा,  यवतमाळ येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तापमान अाहे.  अंदमान समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी (ता. २) विरून गेले होते. उत्तर अंदमान आणि आरकन किनाऱ्यावर ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत होते. राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र, तमिळनाडूपर्यंत आणि छत्तीसगडपासून विदर्भ, मराठवाडा तमिळनाडूपर्यंत दोन वेगवेगळे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. यामुळे मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत असून, शनिवारी (ता. ५) व रविवारी (ता. ६) हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   बुधवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.७, जळगाव ४३.४, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३४.३, मालेगाव ४३.२, नाशिक ३७.९, सांगली ४०.४, सातारा ४१.२, सोलापूर ४३.४, मुंबई ३४.०, अलिबाग ३२.९, रत्नागिरी ३३.६, डहाणू ३४.२, औरंगाबाद ४२.०, परभणी ४४.५, नांदेड ४४.५, अकोला ४४.५, अमरावती ४३.६, बुलडाणा ४१.५, चंद्रपूर ४५.९, गोंदिया ४३.४, नागपूर ४४.५, वर्धा ४५.०, यवतमाळ ४४.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT