Heatwave
Heatwave 
मुख्य बातम्या

उन्हाचा चटका कायम; पूर्व विदर्भात हलक्या पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे : पूर्वमोसमी पावसाने उघडीप देताच राज्यातील उन्हाचा ताप, उकाडा वाढला आहे. राज्याच्या अनेक भागात उन्हाचा चटका कायम राहणार आहे. तर पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  पूर्वमोसमी पावसाचे ढग, वाहणारे वारे यामुळे अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीच्या खाली घसरला होता. पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा तापमान वाढण्यास सुरूवात झाली आहे. गुरूवारी (ता.२३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात बहुतांशी ठिकाणी तर मराठवाड्यातील परभणी, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, मालेगाव, सोलापूरात तापमान ४० अंशांच्या पुढे आहे. उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.  विदर्भ आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थती आहे. त्यापासून मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडूपासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. पूर्व विदर्भात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.  गुरूवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.८, जळगाव ४१.०, धुळे ४१.२, कोल्हापूर ३६.५, महाबळेश्‍वर ३२.१, मालेगाव ४०.२, नाशिक ३७.८, निफाड ३८.०, सांगली ३८.०, सातारा ३८.६, सोलापूर ४१.३, डहाणू ३४.८, सांताक्रूझ ३३.७, रत्नागिरी ३३.९, औरंगाबाद ३८.८, परभणी ४१.९, अकोला ४२.०, अमरावती ४०.०, बुलडाणा ३९.०, ब्रह्मपुरी ४०.९, चंद्रपूर ४१.०, गोंदिया ३९.८, नागपूर ४०.२, वाशीम ४०.०, वर्धा ४१.२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

SCROLL FOR NEXT