उन्हाचा चटका वाढला
उन्हाचा चटका वाढला 
मुख्य बातम्या

उन्हाचा चटका वाढला

टीम अॅग्रोवन

पुणे ः राज्यातील काही भागांत असलेले ढगाळ हवामान निवळून गेले आहे. यामुळे राज्यात हवामान कोरडे असून, काही भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. विदर्भात अजूनही लाट असल्याने कमाल तापमानाचा पारा वाढलेलाच होता. रविवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे ४५.२ अंश सेल्सिअसची उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   बिहार आणि परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर दक्षिण छत्तीसगड या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच तेलंगणा व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.

आसामच्या परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या भागात हवामान ढगाळ राहणार असून, काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रावर असलेले ढगाळ हवामान निवळून गेले आहे. मात्र, आज विदर्भाच्या काही भागात हवामान अंशत ढगाळ राहण्याची शक्यता आहे. यामुळे काही प्रमाणात उष्णतेत वाढ होऊन कमाल तापमानात वाढ होईल.    पूर्व विदर्भात कोरडे हवामान असल्याने अजूनही उष्णतेची लाट आहे. यामुळे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला येथे चांगलाच उन्हाचा चटका होता. बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, गोंदिया या भागात उन्हाची तीव्रता कमी होती. मराठवाड्यात उन्हाच्या झळा काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमान ३३ ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. कोकणातील तापमान सरासरीएवढे होते.     रविवार (ता. १२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३८.९ (१.४), जळगाव ४१.० (-१.७), कोल्हापूर ३७.७ (१.५), महाबळेश्‍वर ३३.१ (२.२), मालेगाव ४२.४ (१.६), नाशिक ३७.५ (-०.८), सांगली ३९.३ (१.८), सातारा ३९.१ (२.५), सोलापूर ४१.६ (०.९), मुंबई ३२.६ (-०.९), अलिबाग ३१.७ (-०.३), रत्नागिरी ३४.० (१.२), डहाणू ३३.८ (-०.३), औरंगाबाद ३९.६ (-०.२), बीड ४०.१ (-०.३), नांदेड ४२.० (०.१), परभणी ४२.३ (०.३), अकोला ४२.४ (०.२), अमरावती ४२.४, बुलडाणा ३९.६ (१.२) ब्रह्मपुरी ४५.० (३.३), चंद्रपूर ४५.२ (२.६), गोंदिया ४१.० (-०.७), नागपूर ४३.६ (१.४), वर्धा ४४.५ (१.८), वाशीम ३९.८, यवतमाळ ४१.८ (०.१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

Commodity Market : हळद, मुगाचे भाव वधारले

SCROLL FOR NEXT