HEAT
HEAT  
मुख्य बातम्या

राज्यात उन्हाची तीव्रता वाढली 

टीम अॅग्रोवन

पुणे ः राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे सकाळपासून प्रखर ऊन पडत असल्याने दुपारी चटका वाढत आहे. काही भागात कमाल व किमान तापमानात चढउतार सुरू झाले आहे. गुरुवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंत जळगाव येथे कमाल ३५.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राज्यातून नैऋत्य मॉन्सूनचे वारे माघारी गेल्याने हवेतील आर्द्रता कमी होऊन वातावरण कोरडे झाले आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत असून ऑक्टोबर हीट वाढू लागली आहे. त्यातच मागील पाच ते सहा दिवसांपासून राज्यात ऊन पडण्यास सुरवात झाली आहे. सकाळपासून उन्हाचा चटका वाढत असल्याने कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत आहे. मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्याचबरोबर किमान तापमानातही काही भागात घट झाली आहे.  विदर्भातील अमरावती येथे सरासरीच्या तुलनेत उणे ४.५ अंश सेल्सिअसने घट होऊन येथे १५.३ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ३.२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.     सध्या उत्तरेकडून वारे वाहण्यास सुरवात झाल्याने राज्यातील वातावरणात बदल होऊ लागले आहेत. त्यातच पाऊस गेल्याने मध्यरात्रीनंतर हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होत असल्याचे दिसून येते. तर काही ठिकाणी धुके पडण्यास सुरवात झाली आहे. पुण्यातही कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. पुण्यात कमाल तापमान जवळपास ३२.६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८.९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT