जत तालुक्यात गारपिटीने द्राक्ष, पपईच्या बागांचे मोठे नुकसान
जत तालुक्यात गारपिटीने द्राक्ष, पपईच्या बागांचे मोठे नुकसान 
मुख्य बातम्या

जत तालुक्यात गारपिटीने द्राक्ष, पपईच्या बागांचे मोठे नुकसान

टीम अॅग्रोवन

सांगली : जत तालुक्यातील बागेवाडी, रामापूर, शेगाव येथे गुरुवारी (ता.25) सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे व घाटगेवाडी परिसरात गारपिटीमुळे द्राक्ष आणि पपईचे मोठे नुकसान झाले आहे. रामापूर ३०० एकर वरील द्राक्ष बागांचे नुकसान झाल्याची भीती. महसूल विभागाने या भागातील नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत. जत शहर व परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चार वाजण्याच्यादरम्यान तालुक्याच्या दक्षिण भागात विजांचा कडकडाट सुरू झाला. परंतु पाऊस पडला नाही. त्यादरम्यान बागेवाडी (ता. जत) येथे सायंकाळी पाच वाजण्याच्यादरम्यान वादळी वाऱ्यामुळे भगवान पडोळकर, सुखदेव आडगळे, शिवाजी वाघमारे यांच्या घरांवरील पत्रे व कौले उडून नुकसान झाले आहे. या परिसरात काही ठिकाणी वादळी वाºयाने झाडे उन्मळून पडली. नुकसानीचा व्हिडिअो... जतपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटगेवाडी व रामापूर गावाच्या उत्तर बाजूला सुमारे तीन चौरस किलोमीटर परिसरात सायंकाळी अचानक गारपीट झाली.घाटगेवाडी येथे वादळी वारा, गारपिटीच्या पावसाने पपई बागेचे साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुपारी चार ते पाचच्यासुमारास वादळी वार्यासह गारांचा पाऊस झाला. वादळी पाऊस व गारा पडल्याने पपई बागेला आलेल्या फुलकळीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या बागेचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, तर कुलकर्णी यांच्या शेताशेजारील शशिकांत भोसले यांच्या एक एकर पपई बागेचेही अडीच लाखाचे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT