सीकर जिल्ह्यात झालेल्या गारपीटने असा गारांचा खट पडला होता.
सीकर जिल्ह्यात झालेल्या गारपीटने असा गारांचा खट पडला होता. 
मुख्य बातम्या

राजस्थानमध्ये अनेक भागांत गारपीट

वृत्तसेवा

जयपूर, राजस्थान ः राज्यात रविवारी (ता.४) सीकर, जयपूर, बिकानेर, अलवर जिल्ह्यांमध्ये अनेक भागांत जोरदार गारपीट झाली; तर झुंझूनू आणि चुरू आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. गारपीट आणि पावसाने शेतातील मोहरी, गहू आणि जवस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी राजस्थानमधील सिकर, बिकानेर आणि अलवर जिल्ह्यांमध्ये जवळपास १५ मिनिटे गारपीट झाली. भारतीय हवामान विभागाने ईशान्य राजस्थानमध्ये गारपिटीचा इशारा दिला आहे. अलवर, भरतपूर, ढोलपूर आणि झुंझूनू जिल्ह्यांमध्ये पुन्हा गारपिटीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जयपूर भागात गारपीट आणि पावसामुळे किमान तापमान १६ अंशसेल्सिअसपर्यंत कमी झाले होते. अचानक आलेल्या पावसाने शेतात उभ्या असलेल्या आणि काढणीला आलेल्या मोहरी, गहू आणि जवस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.    दरम्यान, मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी स्थानिक प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार गारपिटीने या भागातील पिकांचे २० ते ५० टक्के नुकसान झाले आहे.  वीज पडून चार जखमी शाहपुरा भागातही जोरदार गारपीट आणि पाऊस झाला. या वेळी विजांसह साेसाट्याचा वाराही होता. रविवारी सकाळी निरभ्र आकाश असल्याने शेतकरी व कामगार आपआपल्या कामात व्यग्र होते. मात्र, अचानक वातावरणात बदल होऊन गारपीट आणि पावसाला सुरवात झाली. येथे चार कामगार भिंतीचे बांधकाम करत होते. या वेळी त्यांच्यावर वीज कोसळली आणि ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उत्तर प्रदेशातही गारपिटीचा झटका मथुरा जिल्ह्यात रविवारी (ता.८) अनेक भागांत जोरदार गारपीट झाली. या गारपिटीने जिल्ह्यातील जवळपास १२ पेक्षा जास्त गावांतील १०० एकरावर पिकांचे नुकसान झाले आहे. गारपीट झाली असली तरी जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मथुरा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र कुमार म्हणाले, की जिल्ह्यातील अनेक भागांत रविवारी गारपीट झाली आहे. गारपीट आणि नुकसानीची माहिती घेण्यासाठी स्थानिक तहसीलच्या अधिकाऱ्यांचे पथक रवाना झाले आहे. पथकाने पाहणी केल्यानंतरच किती नुकसान झाले, याची माहिती मिळेल. जिल्ह्यातील जवळपास १०० एकरांवरील पिकांना गारपिटीने फटका बसला आहे. मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.  ‘‘मथुरा जिल्ह्यातील रायपूर, मानकपूर, मुसुमना, खुस्लागडी, तिलकगडी, खानपूर, मानगडी, भगवानगढी आणि शेजारच्या गावांमध्ये गहू आणि मसूर या पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतातील वस्तूंचे नुकसान झाले आहे’’, असे बहुजन समाज पार्टीचे आमदार शाम सुंदर शर्मा यांनी सांगितले.  उपविभागीय अधीकारी चट्टा राजेंद्र पेनसिया म्हणाले, की जिल्ह्यातील जवळपास १५ गावांतील पिकांचे नुकासान झाल्याचे वृत्त आहे. गारपीटग्रस्त गावांमध्ये पथक पाठविले असून तेथील नुकसानीची माहिती घेणे व स्थानिकांना अडचणीच्या काळात मदत करणे आदी कामे ही पथके करणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT