jaggery home
jaggery home  
मुख्य बातम्या

शिराळा तालुक्यात गुऱ्हाळ घरांची संख्या घटली

टीम अॅग्रोवन

सांगली ः यंदाच्या गूळ हंगामाच्या प्रारंभापासून गुळाच्या दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे शिराळा तालुक्यात अवघी चारच गुऱ्हाळ घरे सुरू झाली आहेत. शिराळा तालुक्‍यातील गुऱ्हाळ घरे सुरू होऊन महिना उलटून गेला. त्यातच गुऱ्हाळ घरांतील गळीतही मंदावला असल्याने गुऱ्हाळ व्यवसाय अडचणीत आला आहे. परिणामी, गुळाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याची माहिती गुऱ्हाळ घरमालकांनी दिली. शिराळा तालुक्‍यातील कणदूर, बिळाशी, इंग्रुळ, कोकरूड अशा निव्वळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत गुऱ्हाळ घरे सुरू आहेत. यंदा शिराळा तालुक्यात गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध आहे. गेल्या वर्षी महापुरामुळे तालुक्यातील गुऱ्हाळ घरांची मोडतोड झाली होती. त्यामुळे मोजक्याच गुऱ्हाळ घरमालकांनी त्याची दुरुस्ती केली. तर इतर गुऱ्हाळ घरे तशीच आहेत. शिराळा तालुक्यातील उत्पादित झालेल्या गुळाला सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथे मोठी मागणी आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गूळ सौद्यास जातो. गेल्या वर्षी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत गुऱ्हाळ घरे सुरू झाली. गतवर्षी गुळाला ३५०० ते ५००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यंदा ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी झाली. त्यामुळे ऊस पिकात पाणी साचले होते. परिणामी, उसाची वाढ खुंटली. दसऱ्यानंतर गुऱ्हाळ घरे सुरू होतात. परंतु पावसाने गुऱ्हाळ घरे उशिरा सुरू झाली. पूर्वी तालुक्‍यातील पन्नासच्या घरात असलेली गुऱ्हाळ घरांची संख्या आता जेमतेम पाचवर आली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच दर कमी हंगाम सुरू झाला, की गुळाला चांगला दर मिळतो. इथला गूळ कऱ्हाड मार्केट यार्डात विक्रीसाठी पाठवला जातो. यंदा गुळाला ३१०० ते ४००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो आहे. गतवर्षी गुळाला ३५०० ते ५००० असा दर मिळत होता. अर्थात, हंगामाच्या सुरुवातीला प्रति क्विंटलला ४०० ते ६०० रुपयांनी दर कमी मिळत आहे. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी गूळनिर्मितीकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.

अपेक्षित उतारा दोन टन उसाचे गाळप केल्यानंतर सुमारे २७० किलो गुळाचे उत्पादन होते. परंतु पावसामुळे गुळाचा उतारा कमी पडेल अशी शक्यता होती. मात्र उतारा चांगला मिळत आहे.

प्रतिक्रिया यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, पुढील वर्षी गुऱ्हाळ घर सुरू करायचे की नाही, याचा विचार करावा लागणार आहे. - संजय नांगरे, गुऱ्हाळ घरमालक, कोकरूड, ता. शिराळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT