गुजरातमध्ये भुईमुगास 50 रुपये बोनस
गुजरातमध्ये भुईमुगास 50 रुपये बोनस  
मुख्य बातम्या

गुजरातमध्ये भुईमुगास 50 रुपये बोनस

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली ः गुजरातमध्ये यंदा भुईमुगाच्या उत्पादनात वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे आवक वाढून किमती घसरू नये व शेतकऱ्यांना रास्त दर मिळावेत यासाठी राज्य सरकारने सोमवारी (ता. 25) भुईमुगाला क्विंटलमागे 50 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्राने खरीप हंगामासाठी भुईमुगाला क्विंटलमागे 4250 रुपये किमान आधारभूत दर (एमएसपी) आणि 200 रुपये बोनस जाहीर केलेला आहे. मात्र येथील अनेक प्रमुख बाजारपेठांमध्ये भुईमुगाची 3175 ते 3300 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी होत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

याविरोधात शेतकऱ्यांसह अनेक वेळा शेतकरी तसेच राजकीय पक्षांनाही आंदोलन करून विरोध दर्सविला आहे. यंदा अनुकूल हवामान परिस्थितीमुळे येथील भुईमुगाचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा 19 टक्‍क्‍यांनी वाढून 32 लाख टनांपर्यंत राहण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. या परिस्थितीत भुईमुगाची आवक वाढून दर कमी होण्याची शक्‍यता आहे. तसेच सरकारविरोधात जनमत तयार होऊ नये यासाठी राज्य सरकारने क्विंटलमागे 50 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य सरकारमार्फत भुईुमगाची 106 केंद्रांवर शासकीय खरेदी करण्यात येणार आहे. बाजार समित्यांमध्ये जेव्हा भुईमुगाची आवक वाढते अशा वेळी म्हणजे 25 आक्‍टोबरपासून ही केंद्रे खरेदीला प्रारंभ करणार आहेत. शेतकऱ्यांनी यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन सरकारने केले असून खरेदीचा दिवस आणि वेळ याचा संबंधित शेतकऱ्यांना एसएमएस पाठविला जाणार आहे.  

गुजरातची भुईमूग उत्पादन स्थिती (लाख क्विंटलमध्ये)
उत्पादन 14.75 29.40 32
वर्ष 2015-16 2015-16 2017-18 (अंदाज)

(स्रोतः कृषी संचालनालय गुजरात, एसईए)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT