कोल्हापूर जिल्ह्यात वाढती थंडी रब्बी पिकांना पोषक
कोल्हापूर जिल्ह्यात वाढती थंडी रब्बी पिकांना पोषक 
मुख्य बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात वाढती थंडी रब्बी पिकांना पोषक

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढत आहे. ही थंडी उशिरा पेरणी झालेल्या रब्बी पिकांना पोषक ठरण्याची शक्‍यता आहे. हरभरा, गहू आदी पिकांसाठी ही थंडी उपयुक्त ठरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. 

कोल्हापूर जिल्ह्यात खरिपाच्या काढणीनंतर लगेचच रब्बी हंगाम घेतला जातो. सुमारे ४७ हजार हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या होतात. काही भागात अति पाऊस, तर काही भागात कमी पाऊस यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. रब्बीची पेरणीही याच वातावरणात झाली. नोव्हेंबरमध्ये मका, ज्वारी पिकांवर काही लष्करी अळी आल्याने रब्बीचे पीकही हातचे जाते की काय असे चित्र निर्माण झाले. परंतु वेळीच उपाययोजना झाल्याने या अळीमुळे जादा नुकसान झाले नाहीत. यानंतर काही दिवस थंडी एक दोन दिवस पाऊस असे वातावरण राहिले. परंतू याचा विशेष परिणाम रब्बी पिकांवर झाला नाही. 

सध्या तरी पक्वतेच्या अवस्थेत असणाऱ्या रब्बी पिके चांगल्या परिस्थितीत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. अनेक शेतकरी ऊसतोडणी झाल्यानंतर फेरपालटीसाठी उशिरा हरभरा व गव्हाचे पीक घेतात. आता ही पिके उगवणीच्या अवस्थेत आहे. सध्या पडत असलेली थंडी या पिकांना पोषक ठरत आहे. जेवढी जास्त दिवस थंडी असेल तितके दिवस पिकांना ती फायदेशीर ठरणार आहे. यामुळे आणखी पंधरा दिवस तरी थंडीचे प्रमाण कायम रहावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

बाहेरील राज्यातील वादळाचा परिणाम म्हणून पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामान तयार होऊन थंडी कमी होण्याची शक्‍यता होती. परंतु वादळाचा परिणाम या भागात झाला नाही. किरकोळ ढग आहेत. यामुळे थंडीचे प्रमाण फारसे घटले नाही. पुढील काही दिवसही थंडी कायम राहील, अशी शक्‍यता आहे. - राहुल पाटील, हवामान तज्ज्ञ 

नोव्हेबरनंतर पेरणी झालेल्या गव्हाला थंडी फायदेशीर ठरत आहे. या कालावधीतीतील गहू फुटव्याच्या अवस्थेत व लोंबीच्या गर्भावस्थेत आहे. यामुळे ही थंडी गव्हाला फायदेशीर ठरू शकतो. हरभऱ्याच्या फांदा फुटण्यासाठीही थंडी गरजेची असते. यामुळे हरभऱ्याची वाढही चांगली होइल अशी शक्‍यता आहे. - डॉ. अशोक पिसाळ, कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT