सोलापुरात द्राक्ष उत्पादकांची ८१ लाखांची फसवणूक
सोलापुरात द्राक्ष उत्पादकांची ८१ लाखांची फसवणूक 
मुख्य बातम्या

सोलापुरात द्राक्ष उत्पादकांची ८१ लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : उत्तर प्रदेशातून आलेल्या एजंटाने सोलापुरातील मयूर लॉजवर थांबून सावरगाव (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील शेतकऱ्यांची ८१ लाख १७ हजारांची फसवणूक केली आहे. त्याने विक्रीसाठी द्राक्षे घेतली, पण पैसे न देता पळ काढला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकुमार रामपियारे (रा. जलापूर, उत्तर प्रदेश) असे आरोपी एजंटाचे नाव आहे. शंकर बाबू शिंदे (वय ६०, रा. सावरगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. तीन वर्षांपूर्वी द्राक्ष विक्रीसाठी एजंट म्हणून रामपियारे हा शिंदे यांच्या गावात आला होता. यंदाच्या वर्षीही तो आला. गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्षांची पाहणी केली. ५० रुपये किलो दराने द्राक्षे देण्याचा भाव ठरला. ७ एप्रिल २०१९ रोजी एजंट रामपियारे याने गावात येऊन शिंदे यांच्यासह इतर शेतकऱ्यांची द्राक्ष काढून घेतली. एजंट रामपियारे हा ७ ते ११ एप्रिल २०१९ या कालावधीत सोलापूर शहरातील शिवाजी चौकातील मयूर लॉजमध्ये थांबला होता. त्याच्या सांगण्यावरून शेतकऱ्यांनी ट्रकमधून गुजरातमध्ये द्राक्षे पाठविले होती. त्याचा हिशेब रोजच्या रोज मयूर लॉजमध्ये रामपियारे याच्याकडे जाऊन शेतकरी करीत होते. शिंदे यांच्या शेतातील ३६ टन द्राक्षाचा एकूण १६ लाख रुपये हिशेब झाला होता. रामपियारे याने गावाकडे बॅंकेची मशिन खराब झाल्याने पैसे माझ्या खात्यावर जमा झाले नाहीत, तुम्हाला पैसे रोख देतो. बाकीचा माल पैसे दिल्यावर घेऊन जातो, असे सांगितले. रामपियारे याच्यावर विश्‍वास ठेवून शेतकरी सावरगाव येथे परत गेले. दुसऱ्या दिवशी माल काढण्यासाठी कोणीच आले नाही. तसेच पैसे देण्यासाठी रामपियारे हादेखील आला नाही. १३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास गावातील शेतकरी गणेश फंड यांना फोन करून द्राक्ष नेण्यासाठी गाड्या घेऊन गावात येत असल्याचे सांगितले. उरलेला माल काढून नेल्यावर पैसे देतो असे सांगून फोन ठेवला. काही वेळाने शिंदे यांनी एजंट रामपियारे यास फोन केला, मात्र त्याने फोन घेतला नाही. त्यानंतर शिंदे व इतर शेतकरी सोलापुरात मयूर लॉजवर आले. तिथे चौकशी केली, मात्र रामपियारे तिथे नव्हता. तेव्हापासून तो गायब आहे, त्याचा फोनही लागत नाही. यांची झाली फसवणूक शंकर शिंदे यांची १६ लाख, राजकुमार पाटील यांची १२ लाख, सुधीर मगर यांची ११ लाख, गणेश फंड यांची २६ लाख, सुनील शिंदे यांची १० लाख ६७ हजार, मदन फंड यांची पाच लाख ५० हजार, अशी सर्वांची मिळून ८१ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT