देशी कापसाच्या अतिघन लागवडीसाठी अनुदान
देशी कापसाच्या अतिघन लागवडीसाठी अनुदान 
मुख्य बातम्या

अकोला जिल्ह्यात देशी कापसाच्या अतिघन लागवडीसाठी अनुदान

टीम अॅग्रोवन

अकोला : या वर्षी जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून, या योजनेंतर्गत देशी कापसाच्या अतिघन लागवडीची प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत. त्यासाठी शेतकरी गटांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने अनुदान दिले जाणार आहे.

पीक प्रात्यक्षिक प्रकल्प १० हेक्टर क्षेत्र (क्लस्टर) या प्रमाणे राबविणाऱ्या शेतकरी गटांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पीक प्रात्यक्षिकाकरिता आवश्यक बियाणे, बीज प्रक्रियेकरिता जिवाणू खते कृषी विभागातर्फे देण्यात येणार आहेत. इतर निविष्ठा या प्रात्यक्षिक निविष्ठा संचानुसार आणि मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येईल.

सहभागी गटातील शेतकऱ्यांना शेतीदिन व शास्त्रज्ञ भेटीच्या माध्यतातून पीक  उत्पादन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. इच्छुक   नोंदणीकृत शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादन कंपन्यांनी तालुका कृषी   अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

पंपसंचासाठी अनुदान गळीत धान्य व तेलताड अभियान या योजनेंतर्गतत पंपसंच व पाइपकरिता अनुदान दिले जाणार आहे. त्याकरिता २५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावयाचा आहे. पंपसंचाकरीता किमतीच्या ५० टक्के किंवा १० हजार प्रतिनग मर्यादेत अनुदान देय  आहे. कडधान्य पीक प्रात्यक्षिक अनुदान या अभियानांतर्गत तूर, मूग, उडिद, हरभरा व ज्वार या पिकाचे प्रात्यक्षिक आयोजित केले जाणार आहे. खरीप व रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविणाऱ्या शेतकरी गटांना अनुदान मिळणार अाहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT