दूध दरांसाठी ग्रामसभांच्या ठरावाची मोहीम  Gram Sabha resolution campaign for milk rates
दूध दरांसाठी ग्रामसभांच्या ठरावाची मोहीम  Gram Sabha resolution campaign for milk rates 
मुख्य बातम्या

दूध दरांसाठी ग्रामसभांच्या ठरावाची मोहीम 

टीम अॅग्रोवन

नगर : राज्यात दुधाला दर दिला जात नसल्याने दूध उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. असे असताना सरकार लक्ष देईना. खासगी दूध संघ चालकांकडून शेतकऱ्यांची लूट सुरूच असल्याने किसान सभेने १७ जूनला राज्यभर आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दूध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसभेतून राज्यभरातील गावांत ग्रामसभांचे ठराव घेण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनात सहभाग वाढीसाठीही संघर्ष समितीचे कार्यकर्ते काम करणार आहेत. या पूर्वी झालेल्या शेतकरी संपाच्या धर्तीवरच ही मोहीम असेल, असे सांगण्यात आले. कोरोनामुळे लॉकडाउन झाले आणि गेल्या वर्षीप्रमाणेच दुधाच्या व्यवसायावर संकट आले. मागणी कमी झाल्याचे सांगत दुधाचे दर एकाच महिन्यात टप्प्या टप्प्याने सुमारे १२ ते १३ रुपयांनी प्रती लिटर कमी केले. दुधाचे दर कमी झाले आणि पशुखाद्याचे दर वाढल्याने कोंडी झालेले दूध उत्पादक दोन महिन्यांपासून हवालदिल झालेले असताना सरकारने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप किसान सभेच्या नेत्यांनी केला आहे. सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून किसान सभेने १७ जून रोजी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीही सहभागी होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT