लालकंधारी वळू
लालकंधारी वळू  
मुख्य बातम्या

लालकंधारी गोवंश संगोपनासाठी मिळाला शासनाचा आधार...

विवेक पोतदार

जळकोट, जि. लातूर ः गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील पशुपालक परिश्रमातून लालकंधारी गोवंशाचे संगोपन करीत आहेत. या गोवंशाच्या संवर्धनासाठी पशुपालकांना प्रोत्साहन, पशू आरोग्य सुविधा आणि शासनाच्या आधाराची गरज आहे. जळकोट या डोंगरी तालुक्यात नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष असते. खडकाळ, हलक्या प्रतीची जमीन आणि खरिपावरच भिस्त असते. परंतु, शाश्वत उत्पन्नाचीही हमी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा पशुपालन हाच मुख्य व्यवसाय आहे. तालुक्यात सुमारे ५८ हजारांच्या वर पशुधन असून, यात लाल कंधारी गोवंशाची संख्या लक्षणीय आहे, अशी माहिती तालुका पशुधन अधिकारी डॉ. भाऊसाहेब बोडके यांनी दिली. या भागातील लालकंधारी पशुपालकांनी लातूर, उस्मानाबाद, माळेगाव, आदिसह राज्यपातळीवर उत्कृष्ट पशुपालनाबद्दल पारितोषिके मिळवली आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष, दुष्काळाशी सामना करत चारा-पाणीटंचाईवर मात करत येथील पशुपालकांनी लालकंधारी गोवंश चांगल्याप्रकारे सांभाळलेला आहे. या जनावरांना चांगली मागणी आहे.  सध्या जळकोट तालुक्यासाठी एक पशुवैद्यक उपलब्ध अाहे. परंतु येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात एक्स रे, रक्त तपासणी, उपचारासाठीचे साहित्य वेळेवर उपलब्ध नसल्याने पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. जनावरांवर प्राथमिक उपचार सोडले तर बाकी उपचारासाठी उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा आधार घ्यावा लागतो. तेथे जाण्यासाठी वाहनभाड्याचा खर्च येतो. तसेच जनावराच्या उपचारासाठी काहीवेळा सात-आठ दिवस रहावे लागते. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांच्या उपचारासाठी लागणारी औषधे मोफत द्यावीत तसेच पशू दवाखान्यात राहण्याच्या कालावधीत जेवणाची सोय करण्याची मागणी केली आहे.  प्रतिक्रिया लाल कंधारी गोवंश डोंगरी भागात शेतीकाम आणि दुग्ध व्यवसायासाठी योग्य आहे. पशुपालकांनी शुद्ध वशांवळीच्या वळुचा पैदाशीसाठी वापर करावा. दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी जातिवंत दुधाळ गाय आणि शुद्ध वळुची निवड करावी. वर्षातून दोन वेळा जनावरांना लसीकरण करावे. - डॉ. अनिल भिकाने, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT