संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नागपूर जिल्ह्यातील चार उपविभागांत होणार गोवर्धन गोवंश केंद्राची स्थापना

टीम अॅग्रोवन

 नागपूर  : गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेंतर्गत जिल्ह्यातील मौदा, उमरेड, काटोल, सावनेर या चार उपविभागांत गोवर्धन गोवंश केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. शासनाच्या निकषांत बसणाऱ्या संस्थांना या योजनेंतर्गत गोशाळा सुरू करण्याकरिता प्रत्येकी २५ लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४ लाख २८ हजार ३५० जनावरे असून विविध संस्थांच्या माध्यमातून २७ गोशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जनावरांचे पालनपोषण करण्यात येत आहे. ज्या गोशाळा गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेच्या निकषांत बसू शकतात अशा गोशाळांनासुद्धा २५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होऊ शकणार आहे. यासाठी शासकीय नियम व अटी पूर्ण करणारे प्रस्ताव दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक यांनी कळविले आहे.

दुग्धोत्पादन, शेतीकामे, पशुपैदाशीकरिता उपयुक्त नसलेल्या गाय, वळू, बैल व वय झालेल्या गोवंशाचा सांभाळ करणे, अशा पशुधनासाठी चारा, पाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणे, गोवर्धन गोवंश सेवा केंद्रांमधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे, गोमूत्र, शेण आदींपासून विविध उत्पादने, खत, गोबरगॅस व इतर उप पदार्थांच्या निर्मितीस चालना देणे हा गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेचा उद्देश आहे.

दोन टप्प्यांत अनुदान  गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत देण्यात येणारे २५ लाख रुपयांचे अनुदान दोन टप्प्यांत देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात १५ लाख तर दुसऱ्या टप्प्यात १० लाख रुपये वितरित करण्यात येतील. या योजनेतील अटी व शर्ती यांची पूर्तता करणाऱ्या मौदा, उमरेड, काटोल, सावनेर या चार तालुक्यांतील गोशाळा केंद्रांनी पात्रतेसाठी प्रस्ताव संबंधित तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचे मार्फत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडे ३० जून २०१९ पर्यंत पाठविण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक यांनी केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT