Gokul to provide Rs 76 crore to milk institutes
Gokul to provide Rs 76 crore to milk institutes 
मुख्य बातम्या

‘गोकूळ’ देणार दूध संस्‍थांना दरफरकापोटी ७६ कोटी रुपये

टीम अॅग्रोवन

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकूळ) कडून यंदा म्‍हैस व गाय दूध दरफरकापोटी ७१ कोटी रुपये इतकी रक्‍कम प्राथमिक दूध संस्‍थांच्‍या खात्‍यावर २२ ऑक्टोबर रोजी जमा करणार असल्‍याची माहिती गोकूळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी दिली.

संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस दूध दरफरक दिला जातो. त्‍याप्रमाणे यावर्षी  संघाने म्‍हैस दुधाकरीता ४५ कोटी ८३ लाख ४४ हजार तर गाय दुधाकरिता १७ कोटी ४६ लाख ५६ हजार इतका दूध दरफरक व त्‍यावरील ६ टक्के प्रमाणे होणारे व्‍याज १ कोटी ८९ लाख ९० हजार व डिबेंचर्स व्‍याज ७.७५ टक्के प्रमाणे ५ कोटी ५६ लाख ४५ हजार असे एकूण रुपये ७० कोटी ७६ लाख ३६ हजार इतकी रक्‍कम दूध बिलातून दूध संस्‍थांच्‍या खात्‍यावर बँकेत जमा केली जाणार आहे.

मागील वर्षाच्‍या महापूरामुळे शेतकरी अडचणीत आलेला होता. तसेच सगळीकडे पसरत चाललेल्‍या कोरोना संसर्गाच्‍या प्रादुर्भावामुळे सर्व उद्योगधंदे, साखर कारखाने अडचणीत असताना गोकूळ दूध संघाने खर्चात काटकसर करून वर्षभर राज्‍यातील इतर संघांच्‍या तुलनेत जास्‍त दर दिला असल्याचे श्री. आपटे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT