गिरणा धरणात पाणी साठ्यात वाढ न झाल्याने चिंता
गिरणा धरणात पाणी साठ्यात वाढ न झाल्याने चिंता 
मुख्य बातम्या

गिरणा धरणात पाणी साठ्यात वाढ न झाल्याने चिंता

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे, जि. जळगाव ः राज्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार सुरू असताना गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात आजअखेर एक टक्काही वाढ झालेली नाही. या धरणात सद्यःस्थितीत केवळ ७.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने धरण ‘जैसे थे’ आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात धरणात पाणी न वाढल्याने भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यात सर्वत्र पावसाने कहर केला आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणात केवळ ७.५२ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. गिरणा धरणाची साठवण क्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट आहे. यातील जिवंत पाणीसाठा वगळून तीन हजार दशलक्ष घनफूट मृत साठा आहे. धरणाच्या वरच्या बाजूला असलेले चनकापूर, हरणबारी, केळझर व पुनद हे चार प्रकल्प भरल्यानंतर त्यांचे पाणी गिरणा धरणात येते. 

या भागातच पाऊस नसल्याने ‘गिरणा’त एक टक्काही पाणी आलेले नसल्याचे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी हेमंत पाटील यांनी बोलताना सांगितले. गिरणा धरणामुळे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर व पारोळा या तालुक्यातीतील सुमारे ५२ हजार २०९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. मागीलवर्षी या दिवसात गिरणा धरण २५ टक्के भरले होते. सद्यःस्थितीत केवळ सात टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने या धरणावर अवलंबून असणाऱ्या पाच नगरपालिका व १५४ गावांवर पिण्याच्या पाण्याच्या संकट घोंगावत आहे.

४० वर्षांत नऊच  वेळा धरण शंभर टक्के  नांदगाव तालुक्यात येणाऱ्या गिरणा धरणात आठ वर्षांपासून मालेगाव शहरासह औद्योगिक वसाहतीसाठीही पाणी आरक्षित केले आहे. त्यामुळे या धरणातून जळगाव जिल्ह्यासाठी होणारा विसर्ग सातत्याने कमी कमी होत आहे. गेल्या ४० वर्षांत गिरणा धरण केवळ नऊच वेळा शंभर टक्के भरले आहे. माजी आमदार राजीव देशमुख यांच्यामुळे पालिकेची उद्भव योजना झाल्याने चाळीसगाव शहरवासीयांना धरणात अत्यंत कमी पाणीसाठा असताना पाण्याची समस्या भेडसावलेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT