Gazetted Officer of Agriculture Department on leave on Friday
Gazetted Officer of Agriculture Department on leave on Friday 
मुख्य बातम्या

कृषी विभागाचे राजपत्रित अधिकारी शुक्रवारी रजेवर

टीम अॅग्रोवन

सातारा ः तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतील रिक्त पदे भरण्याबाबत प्रशासनाच्या उदासिन भूमिकेच्या निषेधार्थ कृषीसेवा वर्ग- २ संवर्गातील राज्यभरातील सर्व राजपत्रित अधिकारी शुक्रवारी (ता. २८) एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत. दरम्यान, याबाबतचे निवेदन कृषिमंत्री दादा भुसे यांना देण्यात आले आहे.

निवेदनानुसार कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या बहुतेक सर्व योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, मृदसंधारण कामे, पंतप्रधान पीक विमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना, पंतप्रधान कृषी सिंचाई योजना, सांख्यिकी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, राष्ट्रीय फलोत्पादन, जमीन आरोग्य पत्रिका अभियान, वेळोवेळी घोषित केले जाणारे कृषीविस्तार विषयक कार्यक्रम, सप्ताह, पंधरवडे, गुणनियंत्रण आदी विषयक कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे व क्षेत्रीय स्तरावरील रिपोटिंगचे महत्त्वपूर्ण कार्य तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत केले जाते. मात्र, सद्यःस्थितीमध्ये राज्यातील बहुतांश तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमधील कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, अनुरेखक, मिनिस्टरीअल स्टाफ मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहेत. हा स्टाफ प्राधान्याने भरण्याबाबत सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत प्रशासनास वेळोवेळी विनंती करण्यात आली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसामुळे शेकडो संसार उघड्यावर

Turtle Conservation Issue : रायगडमध्ये तापमानवाढीमुळे कासवसंवर्धन संकटात

Forest Fire Himachal : उत्तराखंडसारखीच आगीमुळे हिमाचलची अवस्था, भाजपचा हल्लाबोल, गावकऱ्यांचा इशारा

Summer Heat : उष्णता वाढली पारा ४५ अंश सेल्सिअसवर

Agrowon Podcast : गव्हाच्या भावात सुधारणा ; कापूस, सोयाबीन, हळद, तसेच काय आहेत गहू दर ?

SCROLL FOR NEXT