शेतमाल तारण याेजनेत गूळ, सुपारी, घेवडाही
शेतमाल तारण याेजनेत गूळ, सुपारी, घेवडाही 
मुख्य बातम्या

शेतमाल तारण याेजनेत गूळ, सुपारी, घेवडाही

टीम अॅग्रोवन

पुणे : घेवडा, सुपारी व गूळ उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल तारण याेजनेचा लाभ व्हावा, यासाठी या तीनही शेतमालाचा तारण याेजनेत समावेश करण्यात आला आहे. तर काजूच्या तारण कर्जासाठीचा दर प्रति किलाे ८० रुपयांवरुन १०० रुपये करण्यात आला आहे. अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.  शेतमाल तारण याेजनेची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात पणन मंडळाच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीला सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांच्या सूचनेनुसार घेवडा, सुपारी व गुळाचा समावेश तारण याेजनेत समावेश करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली. तर काजूचा तारण याेजनेसाठीचा प्रतिकिलाेचा दर ८० रुपयांवरून १०० रुपये करण्यास ही मान्यता देण्यात आल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली.  सुपारीला तारण कर्ज देताना बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के किंवा १०० रुपये प्रतिकिलाेने दर आकारण्यात यावेत. बाजार समित्यांनी स्वमालकीची गाेदामे नसल्यास आपल्या कार्यक्षेत्रातील सहकारी किंवा खासगी गाेदामे भाडेतत्त्वावर घेऊन याेजना राबवावी. तसेच या याेजनेतील शेतमालाचा विमा उतरविण्यात यावा. कर्जाची रक्कम बाजार समित्यांनी स्वनिधीतून अदा करावी. तर तारण कर्जाची प्रतिपूर्ती पणन मंडळाकडून करून देण्यात येणार असल्याचेही पणन मंडळाने स्पष्ट केले आहे.

गूळ तारण याेजनेसाठी बाजार समित्यांनी स्वमालकीची शितगृहे उभारण्याच्या सूचना पणन मंडळाने दिल्या आहेत. तर गूळ तारण ठेवताना बाजारभावाच्या ७० टक्के दराने आकारण्यात यावा. तसेच तारण ठेवण्यात येणाऱ्या गुळाच्या दर्जाच्या हमीबाबत प्रयाेगशाळेचे प्रमाणपत्र गरजेचे करण्यात आले आहे. तर गुळासाठीची याेजना अडीच महिन्यासाठी असणार असल्याचे पणन मंडळाने स्पष्ट केले असून, शेतमाल तारण याेजनेच्या सर्वसाधारण अटी गूळ, घेवडा व सुपारीसाठी लागू असणार आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT