संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाला १०० कोटींचा निधी

टीम अॅग्रोवन

 अकोला  ः विदर्भ व मराठवाड्यातील हवामान बदलास अतिसंवदेनशील असलेली ४२१० गावे आणि खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा ५१४२ गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने सुमारे चार हजार कोटींचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत विविध कामांसाठी शासनाने १०० कोटींचा निधी दिला आहे.

कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून निवड केलेल्या गावांमध्ये हवामान बदलास अनुकूल शेतीपद्धती विकसित करण्याच्या हेतूने प्रकल्पांतर्गत विविध उपाययोजना तसेच उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक गावांचे सूक्ष्म नियोजन आराखडे तयार करून अंमलबजावणी सुरू करण्यात आली. निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी पहिल्या टप्‍प्‍यात १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यात बाह्य हिश्शाचा ७० कोटी आणि राज्य हिश्शाचा ३० कोटी रुपयांचा निधी आहे. 

बाह्य हिश्शाच्या निधीतून पीक संवर्धन, लहान-सीमांत शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची योजना, हवामान अनुकूल कृषी प्रकल्प, अर्थसाह्य याविषयासाठी खर्च केला जाईल. राज्याच्या ३० कोटींतून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे, कार्यालयीन खर्च, विविध सेवांसाठीचे खर्च भागविले जातील. प्रकल्पासाठी हा निधी वितरित करण्यास सोमवारी (ता. १५) शासनाने मान्यता दिली आहे. या निधीमुळे आता प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार असे बोलले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT