FRP pieces in Sangli district
FRP pieces in Sangli district 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात `एफआरपी'चे तुकडे

टीम अॅग्रोवन

सांगली : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाल्यानंतर अखेर दराची कोंडी फोडण्यात आली आहे. पहिली उचल प्रतिटन २४०० रुपये देण्याचा निर्णय काही साखर कारखानदारांनी घेतला आहे. उर्वरित बिले दोन टप्प्यांत देण्याचे स्पष्ट करत ‘एफआरपी'चे तुकडे पाडले आहेत. सांगलीतील दत्त इंडियाने मात्र एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

यंदा दुष्काळ, महापूर आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळामुळे सुरुवातीला ऊसतोड झाली आहे. महापुरात ऊस पिकाचे नुकसान होऊन ३० टक्के क्षेत्र घटले. त्यानंतर अवकाळी पावसामुळे कारखान्यांचा हंगाम महिनाभर लांबणीवर गेला. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यानंतर गेले दीड महिने शेतकऱ्यांना ऊसदराची प्रतीक्षा लागून राहिली होती. 

कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपीचा निर्णय जाहीर करून दोन आठवडे उलटले आहेत, तरीही जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला नव्हता. शेतकरी संघटनांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन ऊसदर जाहीर करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली आहे. 

जिल्ह्यात यंदा १२ साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यांनी १६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून साडे सतरा लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्यांचा हंगाम जेमतेम तीन महिनेच चालणार असल्यामुळे दराची उत्सुकता ताणली होती. दत्त इंडियाने एकरकमी एफआरपी जाहीर करून बिले खात्यावर वर्ग केली आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी दत्त इंडियाकडे ऊसतोडणीसाठी पाठपुरावा करत आहेत.

शेतकरी संघटनांचा विरोध

काही कारखान्यांनी धावपळ करत पहिली उचल २४०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर उर्वरित बिले दोन हप्त्यांत दिली जाणार आहेत. एफआरपीचे तुकडे पाडण्यास शेतकरी संघटनेचा विरोध आहे, तरीही कारखान्यांनी तुकडे पाडून दर जाहीर केले आहेत. यानुसार आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिली उचल जमा केली जाणार आहे. त्यामुळे आता शेतकरी संघटना काय करणार? याकडे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT