त्रासलेल्या ग्रामस्थांचा भारनियमनाविरुद्ध मोर्चा
त्रासलेल्या ग्रामस्थांचा भारनियमनाविरुद्ध मोर्चा 
मुख्य बातम्या

त्रासलेल्या ग्रामस्थांचा भारनियमनाविरुद्ध मोर्चा

टीम अॅग्रोवन

दाताळा, जि. बुलडाणा : महावितरण कंपनीला १०० टक्के वीज देयकाची वसुली देणाऱ्या दाताळा गावात भारनियमन केले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तत्काळ भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी अ‍ॅड. हरीश रावळ, विलास खर्चे यांनी कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना तीव्र अांदोलनाचा इशारा दिला.

मलकापूर तालुक्यातील दाताळा हे गाव १०० टक्के वीज देयकाची वसुली देणारे गाव म्हणून अोळखले जाते. यापूर्वी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे भारनियमन केले जात नव्हते. परंतु एक महिन्यापासून काही राजकीय लोकांच्या व लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे महावितरण कंपनीने जाणूनबुजून दाताळा येथील इंदिरा नगर, पुरपिडी, गोपाल नगर, गणपती नगर, शिव कॉलनी, समता नगरमध्ये सात तासांचे भारनियमन सुरू आहे. हा अन्याय दूर करावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT