चार दिवस पावसाची उघडीप राहणार
चार दिवस पावसाची उघडीप राहणार 
मुख्य बातम्या

चार दिवस पावसाची उघडीप राहणार

टीम अॅग्रोवन

पुणे: उत्तर भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यानंतर शुक्रवारी (ता. १२) राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण वगळता राज्याच्या अंतर्गत भागात चार दिवस पावसाची उघडीप कायम राहणार आहे.  आज (ता. १३) राज्यात हलक्या पावसाचा, तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मॉन्सूनची वाटचाल यंदा खूपच अडखळत सुरू आहे. केरळमध्ये उशिरा पोचल्यानंतर महाराष्ट्रातील मॉन्सूनचे आगमन खूपच लांबले. साधारणत: १५ जुलैपर्यंत मॉन्सून देश व्यापतो. यंदा वायव्य भारतातही मॉन्सूनची चाल मंदावली आहे.  राजस्थान, पंजाब, हरियानाच्या काही भागांत अद्याप मॉन्सून दाखल झाला नसून, संपूर्ण देश व्यापण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.  दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहार परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने दोन दिवस घाटमाथा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात पावसाने जोर धरला. तर मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागासह, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप आहे. यातच कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यानंतर राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान असले तरी पावसाच्या सरी थांबल्या आहेत. बुधवारपर्यंत राज्यात पावसाची उघडीप कायम राहण्याचा शक्यता आहे.  शुक्रवारी (ता.१२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : वेंगुर्ला १६०, चिपळूण १५०, राजापूर १३०, दोडामार्ग १२०, लांजा, श्रीवर्धन, सावंतवाडी, वैभववाडी, खेड प्रत्येकी ११०, मंडगणगड, मुलदे, हर्णे प्रत्येकी ९०, पोलादपूर ८०, तळा, कुडाळ, गुहागर ७०, देवगड, मालवण, कुलाबा प्रत्येकी ६०, रत्नागिरी, कणकवली, संगमेश्‍वर, देवरूख, महाड, रोहा, म्हसळा प्रत्येकी ५०.  मध्य महाराष्ट्र : गगनबावडा १६०, त्रिंबकेश्‍वर १४०, महाबळेश्‍वर १२०, पाटण ८०, इगतपुरी, पौड, राधानगरी, गारगोटी, वेल्हे प्रत्येकी ६०, लोणावळा, चंदगड प्रत्येकी ५०, आजरा, जावळीमेढा, पन्हाळा प्रत्येकी ४०, शाहूवाडी, खेड, कागल, अकोले, गडहिंग्लज, घोडेगाव प्रत्येकी ३०.   मराठवाडा : देगलूर, मुखेड, बिलोली प्रत्येकी ५०, औंढा नागनाथ, सोनपेठ प्रत्येकी ४०, पूर्णा, जळकोट, परभणी, लोहारा, मंथा ३०, उदगीर, नायगाव खैरगाव, धर्माबाद, पाथरी, उस्मानाबाद, अर्धापूर, मानवत, गेवराई, माजलगाव प्रत्येकी २०.     घाटमाथा : शिरगाव १७०, दावडी १४०, कोयना १३०, आंबोणे ९०, कोयना पोफळी, भिरा प्रत्येकी ८०, लोणावळा (टाटा) शिरोटा ७०, खंद ६०, भिवापुरी ४०, वळवण, वाणगाव, खोपोली ३०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT