साडेचार हजार रुपयांचा  पहिला हप्ता उसाला द्या  Four and a half thousand rupees Give the first installment to Usa 
मुख्य बातम्या

साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला द्या 

यंदा उसाला उत्पादन खर्चावर आधारित एकरकमी एफआरपी ४५०० रुपये प्रति टन पहिला हप्ता मिळावा, असा ठराव कुंभी कारखाना येथे शेतकरी संघटनेच्या बैठकीत झाला.

टीम अॅग्रोवन

कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन खर्चावर आधारित एकरकमी एफआरपी ४५०० रुपये प्रति टन पहिला हप्ता मिळावा, असा ठराव कुंभी कारखाना येथे शेतकरी संघटनेच्या बैठकीत झाला. 

शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश संघटना व बळीराजा संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी संघटनेला पाठिंबा देत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील यांनी यंदा उसाला ‘एफआरपी’चा ४५०० पहिला हप्ता मिळावा, सर्व ग्रामपंचायतींनी ठराव करून आमदारांकडे द्यावेत. केंद्राचे कृषी कायदे राज्यात लागू करू नयेत, अशी मागणी करण्यात आली.  आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी सामुदायिक विरोध केला तरच एकरकमी एफआरपी मिळेल, तीन टप्प्यांत दिल्यास १५ टक्के व्याज शेतकऱ्यांना द्यावे लागेल, असे आयुक्तांचे आदेश असल्याचे स्पष्टीकरण दिले. सरपंच जोत्स्ना पाटील यांनी एकरकमी एफआरपी देण्यासाठी ठराव केल्याचे सांगून सर्व ग्रामपंचायतींनी ठराव करून आमदारांकडे द्यावेत, अशी मागणी केली.  युवराज आडनाईक, आनंदा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दादूमामा कामिरे यांचे मनोगत झाले. बदाम शेलार यांनी आभार मानले. गुणाजी शेलार, नारायण मोरे, के. एन. किरुळकर, तानाजी शेलार, युवराज पाटील, तुकाराम आडनाईक, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Free Utensils Scheme: बांधकाम कामगारांसाठी खास कल्याणकारी योजना; मिळणार मोफत गृहउपयोगी वस्तू

Plastic Flower Ban : कृत्रिम फुलांवर बंदीबाबत निर्णयाची अंमलबजावणी कधी?

Flood Crop Damage : पिकांसोबत मातीही गेली वाहून

Nimboli Ark: निंबोळी अर्क घरच्या घरी कसा तयार करायचा? निंबोळी अर्काचे फायदे काय ?

Agrowon Podcast: हळदीच्या दरावरील दबाव कायम, गवारला उठाव कायम, शेवगा महागले; काकडी आवक वाढली, लसूणचे भाव स्थिर

SCROLL FOR NEXT