अकोला ः मासा येथे कपाशी पिकाची पाहणी करून बोंड अळीबाबत चर्चा करताना यशवंत सिन्हा.
अकोला ः मासा येथे कपाशी पिकाची पाहणी करून बोंड अळीबाबत चर्चा करताना यशवंत सिन्हा. 
मुख्य बातम्या

यशवंत सिन्हा यांनी केली कपाशीच्या पिकाची पाहणी

टीम अॅग्रोवन
अकोला  ः विदर्भातील कपाशी पिकावर बोंड अळीचा वाढलेला प्रकोप भयंकर असून, चिंतेचा बनला आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना सहकार्य केले पाहिजे, असे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले. अकोला तालुक्यातील मासा गावात त्यांनी भेट देऊन कपाशीच्या पिकाची पाहणी केली. 
 
या मासा गावात बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बीटी कपाशी लावली असून, त्यात एकरी दोन क्विंटलही कापूस झालेला नाही. याबाबत श्री. सिन्हा यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
 
या वेळी सिन्हा यांच्यासोबत शेतकरी जागर मंचाचे दिलीप मोहोड, केदार बकाल, रवी अरबट, राजू मंगळे, मनसेचे अकोला तालुका अध्यक्ष सतीश फाले, पोलिस पाटील अंगतराव फाले, बबनराव फाले, ओम प्रकाश फाले, शरद फाले, संजय सहारे, वैभव फाले, प्रशांत फाले अादी उपस्थित होते.
 
या हंगामात बोंड अळीने कपाशीचे ७० टक्क्यांवर नुकसान झाले असून, यंत्रणांनी सर्वेक्षण करायला हवे होते. मात्र मासा गावात कुणी भेट दिली नसल्याची बाब शेतकऱ्यांनी सिन्हा यांच्या निदर्शनास अाणून दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

SCROLL FOR NEXT