कांदेबाग केळी लागवड वाढण्याचा अंदाज
कांदेबाग केळी लागवड वाढण्याचा अंदाज 
मुख्य बातम्या

कांदेबाग केळी लागवड वाढण्याचा अंदाज

टीम अॅग्रोवन

जळगाव : जिल्ह्यात कांदेबाग केळीचे क्षेत्र यंदा सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टरने वाढू शकते. चोपडा, जळगाव आणि यावल तालुक्‍यात कांदेबाग केळी लागवड सुरू आहे. ऑक्‍टोबरअखेरपर्यंत ही लागवड सुरू राहील.

कापूस पीक आतबट्ट्याचे बनले. गुलाबी बोंड अळी व मजुरीचा खर्च वाढल्याने ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक जलसाठा आहे. जमीन हलकी, मध्यम आहे, त्यांनी कांदेबाग केळीला पसंती दिली आहे. गिरणा व तापी नदीच्या काठावरील गावांमध्ये ही लागवड अधिक असून, पाचोरा व भडगाव तालुक्‍यातही काही प्रमाणात लागवड सुरू आहे. चोपडा तालुक्‍यात सर्वाधिक म्हणजे पावणेपाच हजार हेक्‍टरवर कांदेबाग केळीची लागवड अपेक्षित आहे. जळगाव तालुक्‍यातही सुमारे १८०० हेक्‍टवर केळी लागवड होऊ शकते.

पाचोरा व भडगावातील काही शेतकरी यंदा कांदेबाग केळी लागवडीकडे वळले आहेत. तितूर नदीलगतचा भाग आणि भडगाव, पाचोरा तालुक्‍यात यंदा कांदेबाग केळी लागवडीचे प्रयोग काही शेतकरी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात कांदेबाग केळीचे एकूण क्षेत्र सुमारे साडेआठ हजार हेक्‍टर किंवा यापेक्षा अधिक राहू शकते, असे सांगण्यात आले.

कापूस पिकाला पर्याय ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक जलसाठा आहे, त्यांनी कापूस पिकाऐवजी केळीला पसंती दिली. मागील दोन वर्षे तिला मिळालेले दर, हे कारण त्यामागे आहे. कापसावर गुलाबी बोंड अळी व इतर समस्या वाढत आहेत. वेचणीला मजूर ऐनवेळी मिळत नाहीत. उत्पादनही जेमतेमच असते. फेब्रुवारीत उपटून नंतर बाजरी किंवा मक्‍याचे पीक घेतात. सतत पेरणी व पाणी दिल्याने जमिनीचा पोतही बिघडतो. म्हणून केळीचे पीक घेण्यास शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT