जगभरात अन्नधान्याच्या किमती चढ्याच Food prices are rising worldwide
जगभरात अन्नधान्याच्या किमती चढ्याच Food prices are rising worldwide 
मुख्य बातम्या

जगभरात अन्नधान्याच्या किमती चढ्याच

टीम अॅग्रोवन

रोम (इटली) : जगभरात डिसेंबर महिन्यात अन्नधान्याच्या किमती चढ्याच राहिल्या आहेत. मागील सात महिन्यांपासून जगभरात अन्नधान्याच्या किमतीत वाढीचा कल आहे. दुग्धजन्य पदार्थ, फळे आणि खाद्यतेलांच्या दरात सर्वाधिक दरवाढ झाली आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ)वतीने ही माहिती देण्यात आली आहे. एफएओने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात अन्नधान्यांच्या किमतीत २.२ टक्क्याने वाढ झाली आहे. गहू, मका, तांदळाच्या दरात वाढ नोंदली गेली आहे. ही वाढ अमेरिका आणि रशियातही दिसून आली आहे. २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये तांदळाच्या किमतीत ८.६ टक्क्यांनी, मक्याच्या दरात ७.६ टक्के, तर गव्हाच्या दरात ५.६ टक्के वाढ झाली आहे. हाच दरवाढीचा कल खाद्यतेलांमध्ये दिसून आला आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१२मध्ये खाद्यतेलांच्या दरात सर्वाधिक वाढ झाली होती. त्या तुलनेत खाद्यतेलांच्या किमतीत ४.७ टक्के वाढ दिसून आली आहे. इंडोनेशिया पामतेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. इंडोनेशियात पामतेलाच्या निर्यातीवरील कर वाढविण्यात आल्यामुळे जगभरात पामतेलाच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी इतर खाद्यतेलांच्या किंमतीतही वाढ नोंदली गेली आहे. अर्जेटिनामध्ये प्रदीर्घ संप झाल्याने सोयाबीनपासून तेल तयार करण्याची आणि वाहतुकीची प्रक्रिया विस्कळीत झाली होती, त्याचा परिणाम म्हणून सोयाबीनच्या तेलात वाढ झाली आहे.  डिसेंबर महिन्यांत दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत ३.२ टक्के वाढ झाली आहे. ही वाढ मागील सलग सात महिन्यांपासून होताना दिसत आहे. पश्‍चिम युरोपात दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचा परिणाम म्हणून दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत ही दरवाढ झाली आहे. मांसाच्या दरातही वाढ नोंदली गेली आहे. २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये मांसाच्या दरात ४.५ टक्के वाढ झाली आहे. तर नोव्हेबरच्या तुलनेत डिसेंबर महिन्यांत १.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हाच वाढीचा कल साखरेच्या दरा बाबतही कायम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT